चेहरा धुतल्यानंतर कोरडा करण्यासाठी टॉवेलचा वापर करताय? सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 11:28 AM2018-08-19T11:28:09+5:302018-08-19T11:38:29+5:30

चेहऱ्याचं सौंदर्य राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ ठेवणं. आपण चेहरा धुण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या फेसवॉशचा किंवा साबणाचा वापर करतो.

Towel is harmful for your skin | चेहरा धुतल्यानंतर कोरडा करण्यासाठी टॉवेलचा वापर करताय? सावधान!

चेहरा धुतल्यानंतर कोरडा करण्यासाठी टॉवेलचा वापर करताय? सावधान!

Next

(Image Creadit : bustle.com)

चेहऱ्याचं सौंदर्य राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ ठेवणं. आपण चेहरा धुण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या फेसवॉशचा किंवा साबणाचा वापर करतो. पण कितीही चेहरा स्वच्छ धुतला तरीदेखील आपण सगळेच एक चुक प्रामुख्याने करतो ती म्हणजे, चेहरा धुतल्यानंतर आपण कोरडा करण्यासाठी टॉवेलचा वापर करतो. पण असं करणं त्वचेसाठी नुकसानदायक ठरतं. जाणून घेऊयात टॉवेलमुळे त्वचेला होणाऱ्या नुकसानांबाबत...

चेहरा धुतल्यानंतर टॉवेलनं कोरडा करणं ही सर्वसामान्य गोष्ट वाटत असेल पण असं करून तुम्ही फार मोठी चूक करत आहात. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, जर चेहरा धुतल्यानंतर ओल्या त्वचेवर कोणत्याही ब्युटी प्रोडक्टचा वापर केलात तर चेहऱ्यासाठी लाभदायक असतं. कारण त्यातील गुमधर्म चेहऱ्याच्या त्वचेच्या मुळांपर्यंत जातात.  पण त्याचवेळी टॉवेलने जर चेहरा कोरडा केला तर चेहऱ्याची त्वचा कोरडी होते आणि चेहऱ्यावर लावण्यात आलेल्या ब्युटी प्रोडक्टसचा चेहऱ्याला फायदा होत नाही.

आपण जो टॉवेल वापरतो तो दिवसभर एकाच ठिकाणी ठेवलेला असतो. त्यामुळे हवेमध्ये असलेले धुळीचे कण आणि बॅक्टेरिया टॉवेलवर चिकटतात. अशा टॉवेलचा वापर केल्याने ते धुळीचे कण आणि बॅक्टेरिया चेहरा कोरडा करताना आपल्या त्वचेच्या मुळापर्यंत जातात. याचा परिणाम म्हणजे त्वचेला इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. 

चेहरा धुतल्यानंतर त्याला टॉवेलनं स्वच्छ करण्याऐवजी आपल्या हातांनीच चेहऱ्यावरील एक्स्ट्रा पाणी काढून टाका आणि चेहरा कोरडा होऊ द्या. चेहरा कोरडा झाल्यानंतरच चेहऱ्यावर इतर प्रोडक्टसचा वापर करा. 

चेहरा लवकर कोरडा करायचा असेल तर, टॉवेलचा वापर न करता तुम्ही टिशू पेपरचा वापर करू शकता, पण बंद बॉक्समध्ये असलेल्या टिशू पेपरचाच वापर करा. 

Web Title: Towel is harmful for your skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.