शांततेसाठी कुटुंबासह ट्रीपही महत्वाची

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2016 12:31 PM2016-09-11T12:31:48+5:302016-09-11T18:01:48+5:30

कुटुंबासह ट्रीपला गेल्यानंतरही मेडिटेशनसारखचे शांतता व स्थैर्य लाभत हे एका अभ्यासातून समारे आले आहे

Trip to family is important for peace | शांततेसाठी कुटुंबासह ट्रीपही महत्वाची

शांततेसाठी कुटुंबासह ट्रीपही महत्वाची

Next

/>
जीवन जगत असताना , मानसिक शांतता असणे हे खूप गरजेचे आहे. त्याकरिता मेडिटेशन केले जाते. परंतु, कुटुंबासह ट्रीपला गेल्यानंतरही मेडिटेशनसारखचे शांतता व स्थैर्य लाभत हे एका अभ्यासातून समारे आले आहे.  ट्रीपमुळे मन शांत राहून, कामाचा उत्साह वाढतो. या सहलीचा परिणाम हा केवळ  ताण कमी होण्यााठीच होत नाही. तर त्यामुळे शरीराची पचनश्क्तीही सुधारते मनामध्ये नकारात्मक विचार कमी होऊन, सकारात्मक विचार येतात. त्यामुळे शांतीसाठी मेडिटेशन सारखेच ट्रीप करणे सुद्धा चांगले असल्याचे समोर आले आहे. हल्लीच्या युगात प्रचंड स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे भटकंती करण्यासाठी अनेकांना वेळच नाही. कुटुंबासह भटकंती म्हटले तर ते शक्यच वाटत नाही. परंतु, जीवन हे निरोगी राखण्यासाठी भटकंती हे खूप गरजेचे आहे. त्याकरिता प्रत्येकाने जीवनात मेडिटेशन बरोबरच कुटुंबासोबत भटकंती करावे. या अभ्यासात ३० ते ६० वयोगटातील ९४ निरोगी स्त्रियांचा सर्व्हे करण्यात आला. कॅलिफोर्नियातील एका रिसॉर्टमध्ये त्यांना सहा दिवस ठेवण्यात आले होते. यातील अर्ध्यांना मेडिटेशन तर अर्ध्यांना ट्रीपला पाठविण्यात आले. त्यावरुन हे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Trip to family is important for peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.