'हे' गैरसमज आधीच माहिती असतील तर केसांच्या समस्या वेळीच टाळता येतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 02:26 PM2020-02-17T14:26:41+5:302020-02-17T14:27:14+5:30
सगळ्यांनाच असं वाटत असत की आपले केस सुंदर आणि दाट असावेत.
सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपले केस सुंदर आणि दाट असावेत. आपले चांगले केस आपलं व्यक्तीमत्व प्रभावी बनवत असतात. केसांची काळजी घेण्यासाठी वर्षानुवर्ष लोक प्रयत्न करत आले आहेत. केसांमध्ये कोंडा असेल तर तेल लावा आणि ताण-तणाव असेल तर केस पांढरे होतात असे अनेक समज आणि गैरसमज आहेत. त्यामुळे तुमचे केस वयाआधीच पांढरे दिसू लागतात आणि गळू लागतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे केस खुप खराब होत असतात.
(Image Credit : jrsnider.com)
केस कापल्याने वाढतात
हेअरकट केल्यामुळे केस वाढतात. हे खरं असलं तर आपण फक्त चांगली वाढ होण्यासाठी केस कापत असू तर हा एक मोठा गैरसमज आहे. केस कापल्यामुळे फक्त डॅमेज आणि फाटे फुटलेले केस रिपेअर होण्यास मदत होते. तसंच केसांची वाढ होणे हे केसांच्या मुळांवर अवलंबून असते.
रोज शॅम्पूने केस धुतले पाहिजेत
(image credit- medical news today)
केसांना रोज शॅम्पू लावल्याने केस चांगले राहतात. हा मोठा गैरसमज आहे. शॅम्पुमध्ये केमिकल्स असतात. आणि केमिकल्सच्या वापरामुळे केसांचे नैसर्गीक तेल निघण्याची शक्यता असते. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवायला हवेत. रोज शॅम्पूचा वापर केल्याने केसांची चमक सुद्धा कमी होऊ शकते. शॅम्पू हा पूर्ण केसांना न लावता फक्त स्काल्पला लावावा.
तणावामुळे केस पांढरे होतात
ताण-ताणाव घेतल्यामुळे केस पांढरे होतात कारण मॅलानीन पिगमेंट संपल्यामुळे केसांना आवश्यक असलेले घटक मिळत नाहीत. त्यामुळे केस पांढरे होतात. मॅलानीन पिगमेंट योग्य प्रमाणात असेल तर केस काळे राहतात. ( हे पण वाचा-कमी वयातच त्वचेवर आलेल्या सुरकुत्या दूर करण्यासाठी 'हे' फेशियल ठरेल इफेक्टिव्ह)
कोंडा म्हणजे कोरडे केस
(image credit-women fitness)
जर तुमच्या स्काल्पवर कोंडा झाला असेल तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या केसांची त्वचा शुष्क आणि कोरडी आहे. केसांवर इन्फेक्शन किंवा कोंडा यीस्टमुळे होत असतो आणि हे फक्त तेल लावलेल्या केसांवरच होत असते. त्यामुळे कोंडा झाला तर केस कोरडे आहेत असं समजू नका. ( हे पण वाचा-कोणत्याही प्रकारच्या त्वचेवरून काळपटपणा आणि पिंपल्स होतील दूर, पुदीन्याचा 'असा' करा वापर!)