घरीच तयार करा बीटाचा फेसपॅक; त्वचेवर ग्लो येण्यास करेल मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 02:54 PM2019-09-23T14:54:42+5:302019-09-23T14:55:41+5:30
चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासाठी किंवा चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी अनेकदा भाज्या आणि फळांचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो. याशिवाय चेहऱ्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकल्स असणाऱ्या उत्पादनांपासूनही दूर राहण्यास सांगितलं जातं.
चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासाठी किंवा चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी अनेकदा भाज्या आणि फळांचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो. याशिवाय चेहऱ्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकल्स असणाऱ्या उत्पादनांपासूनही दूर राहण्यास सांगितलं जातं. जर भाज्यांमधील बीटाबाबत सांगायचे झाले तर यामध्ये न्यूट्रिशन वॅल्यू मुबलक प्रमाणात असतात.
बीट आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे तुम्ही ऐकलं असेलच. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? बीटाचा वापर करून तयार करण्यात आलेला फेसफॅक त्वचेसाठी कितपत फायदेशीर ठरू शकतं. जर तुम्ही दररोज चेहऱ्यासाठी बीटापासून तयार केलेला फेसपॅक वापरला तर चेहऱ्यावर पिंकिश ग्लो येतो. तसेच चेहऱ्यावरील डागही दूर होतात. याव्यतिरिक्त चेहऱ्यावरील डेडे स्किन सेल्सही दूर होतात.
तसं पाहायला गेलं तर बीट किसून त्याचा रस चेहऱ्यावर लावणं फायदेशीर ठरतं. तसेच बीटाचा फेसपॅकही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
असा तयार करा घरच्या घरी बीटाचा फेसपॅक :
- अर्धं कापलेलं बीट
- गुलाब पाणी किंवा साधं पाणी
- वरील दोन्ही गोष्टी ब्लेंड करून घ्या आणि त्याचा रस काढून घ्या.
- बीटाचा रस बेसन, योगर्ट किंवा संत्र्याच्या सालींच्या पावडरमध्ये एकत्र करा.
- तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
बीटाचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावल्याने फरक दिसून येईल.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)