डार्क सर्कल दूर करण्यासाठी बटाटाच्या रसाचा 'असा' करा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 10:42 AM2019-09-24T10:42:05+5:302019-09-24T10:50:25+5:30
खाण्यासोबतच बटाट्याचा सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदा होतो हे फार कमी लोकांना माहीत असतं. बटाट्याच्या रसाचा वापर तुम्ही डार्क सर्कल दूर करण्यासाठी करू शकता.
(Image Credit : organicfacts.net)
बटाट्याची भाजी किंवा वेगवेगळे पदार्थ सर्वांनाच आवडतात. बटाटा खाण्याचे वेगवेगळे आरोग्यदायी फायदेही अनेकांना माहीत असेल. मात्र, खाण्यासोबतच बटाट्याचा सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदा होतो हे फार कमी लोकांना माहीत असतं. बटाट्याच्या रसाचा वापर तुम्ही डार्क सर्कल दूर करण्यासाठी करू शकता. यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर कसा कराल हे जाणून घ्या....
कसा होतो बटाट्याचा फायदा?
(Image Credit : makeupandbeauty.com)
१) बटाटे आणि अंड्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सैलपणा दूर होऊन त्वचा तरूण दिसू लागते. अर्धा बटाट्याचा रस घ्या, त्यात अंड्याचा पांढरा भाग टाका आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. अर्धा तास हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
२) अर्धा बटाट्याच्या रसात दोन चमचे दूध मिश्रित करा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण चेहऱ्यावर तसंच अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा. याने चेहरा ताजातवाणा आणि तरूण दिसेल. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरावा.
३) त्वचेवर डाग दूर करण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरतो. पूर्वी त्वचेवरील खाज दूर करण्यासाठी चिकित्सक गुणांमुळे बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावला जात होता. बटाट्याचे स्लाइस त्वचेवरील रॅशेज आणि इरिटेशन सारखी समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरतात.
४) बटाटाच्या रस चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. बटाट्यामुळे गरमीने खराब झालेल्या चेहऱ्याला आराम मिळतो आणि डाग दूर होण्यास मदत मिळते.
डार्क सर्कल कमी करतो बटाटा
बटाट्याचा वापर करून डोळ्यांखालील डार्क सर्कल दूर करण्यास मदत मिळते. बटाटे आणि काकडीचा रस समान प्रमाणात एकत्र करून डोळ्याच्या आजूबाजूला लावा. याने फायदा होईल.
(टिप : वरील लेखात सर्व घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. ते सर्वांनाच सूट होतील असं नाही. काहींना बटाट्याची अॅलर्जी असण्याची शक्यता असते. त्यामुळे आधी टेस्ट करून नंतरच याचा वापर करावा.)