पार्लरचे पैसे वाचवा; घरीच ड्राय स्किनसाठी वापर हे फेस पॅक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 11:26 AM2018-10-12T11:26:26+5:302018-10-12T11:29:33+5:30
चेहरा स्वच्छ, सुंदर आणि चमकदार करण्यासाठी अनेकप्रकारचे फेसपॅक आहेत. पण तुमच्या त्वचेसाठी कोणता फेस पॅक चांगला राहील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
चेहरा स्वच्छ, सुंदर आणि चमकदार करण्यासाठी अनेकप्रकारचे फेसपॅक आहेत. पण तुमच्या त्वचेसाठी कोणता फेस पॅक चांगला राहील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगवेगळा असतो. कुणाची सामान्य तर कुणाची कोरडी त्वचा असते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर खाली दिलेले फेसपॅक तुम्ही ट्राय करु शकता.
नियमितपणे त्वचेची काळजी घेण्यासाठी केळी स्मॅश करुन त्यात मध मिश्रित करा आणि चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्यांवर २० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्या. याने त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.
अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यात दही आणि मध मिश्रित करुन फेस पॅक तयार करा. आता हा पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. याने तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर होईल आणि चेहऱ्यावर चमक येईल.
मेथीचे हिरवी पाने बारीक करुन रात्री चेहऱ्यावर लावा आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. असे नियमीत केल्याने चेहऱ्याच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतील आणि चेहऱ्याचा रंगही उजळेल.
कोरडी त्वचा असल्याने स्क्रब करतानाही तुम्हाला फार काळजी घ्यावी लागते. स्कॅबिंगसाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करु शकता. या तेलात साखर मिश्रित करुन स्क्रब करा.