त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी 'हे' फेशिअल ठरतात फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 12:17 PM2018-10-20T12:17:27+5:302018-10-20T12:18:24+5:30
प्रत्येकालाच फुलं आवडतात. फुलं पाहिली की, डोळ्यांनादेखील आराम मिळतो. जास्तीत जास्त लोक फुलांचा उपयोग पूजेसाठी किंवा सजावटीसाठी करतात. परंतु फार कमी लोकांना फुलांचा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी होणारा उपयोग माहीत आहे.
प्रत्येकालाच फुलं आवडतात. फुलं पाहिली की, डोळ्यांनादेखील आराम मिळतो. जास्तीत जास्त लोक फुलांचा उपयोग पूजेसाठी किंवा सजावटीसाठी करतात. परंतु फार कमी लोकांना फुलांचा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी होणारा उपयोग माहीत आहे. फुलांच्या फेशिअलचा उपयोग त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी करण्यात येतो. फूलांपासून तयार करण्यात आलेल्या फेशिअलमुळे चेहऱ्याच्या प्रत्येक समस्येपासून सुटका होते. जाणून घेऊया कोणकोणत्या फुलांच्या फेशिअल्समुळे त्वचेच्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात...
रोज फेशियल
काही लोकांना ओपन पोर्सची समस्या उद्बवते. यापासून सुटका करून घेण्यासाठी रोज फेशिअल ट्राय करता येईल. त्यामुळे स्किनवर गुलाबी निखार येण्यास मदत होईल.
मेरीगोल्ड फेशिअल
ड्रायनेसपासून सुटका करून घेण्यासाठी मेरिगोल्ड फ्लावरचं फेशिअल करू शकता. त्यामुळे ड्राय स्किनची समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच नैसर्गिक ग्लो येतो.
लेव्हेंडर फेशिअल
चेहऱ्यावर अॅक्ने आणि सुरकुत्या असतील तर त्यासाठी लेव्हेंडरच्या फुलांचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे सनबर्नपासून बचाव होतो.
जॅस्मिन फेशिअल
पिंपल्स गेल्यानंतर चेहऱ्यावरील डाग आणि निशाण कमी करण्यासाठी जॅस्मिनच्या फुलाचं फेशिअल करणं फायदेशीर ठरतं.
सनफ्लॉवर फेशियल
स्किन नेरेश करण्यासाठी सनफ्लॉवर फेशिअल फायदेशीर ठरतो. त्यामुळे त्वचेवरील डलनेस दूर होतो.