हिवाळ्यात वाढते डॅंड्रफची समस्या, 'या' घरगुती उपायांनी करा दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 11:32 AM2019-10-30T11:32:15+5:302019-10-30T11:32:34+5:30
डॅंड्रफ म्हणजेच केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या हिवाळ्यात अधिक वाढते. हवेतील शुष्कपणा डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा वाढवतो. ज्यामुळे डॅंड्रफची समस्या गंभीर होते.
(Image Credit : thehealthy.com)
डॅंड्रफ म्हणजेच केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या हिवाळ्यात अधिक वाढते. हवेतील शुष्कपणा डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा वाढवतो. ज्यामुळे डॅंड्रफची समस्या गंभीर होते. हिवाळ्यात डॅंड्रफपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. हे घरगुती उपाय सुरक्षित असण्यासोबतच केसांच्या आरोग्यासाठीही चांगले आहेत.
कोमट तेलाने डोक्याची मसाज
(Image Credit : listsdiary.co)
डोक्याच्या त्वचेची कोमट तेलाने मसाज केल्याने डोक्यातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. डॅंड्रफ किंवा कोंडा आणि स्प्लिट्स एन्डच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कोमट तेलाने डोक्याची मसाज करणे फायदेशीर ठरतं.
खोबऱ्याच्या तेलाने केस होतात मॉइश्चर
खोबऱ्याचं तेल हे केसांसाठी नैसर्गिक मॉइश्चरायजर म्हणून काम करतं आणि याने डोक्याच्या त्वचेसंबंधी समस्याही दूर होतात. आठवड्यातून एक किंवा दोनदा तुम्ही खोबऱ्याच्या कोमट तेलाने डोक्याची मसाज करू शकता.
केसांना द्या स्टीम
(Image Credit : thehealthy.com)
कोमट तेलाने डोक्याची मसाज केल्यावर स्टीम दिल्यावरही डॅंड्रफची समस्या दूर होण्यास मदत मिळते. यासाठी एक टॉवेल गरम पाण्यात बुडवून नंतर पिळून घ्या. हा टॉवेल ५ मिनिटांसाठी डोक्यावर बांधून ठेवा. असं ३ ते ४ वेळा करा आणि नंतर केस शॅम्पूने धुवावे.
लिंबाच्या रसाने डॅंड्रफ होतात दूर
जर तुमच्या केसात डॅंड्रफ झाले असतील तर रात्री केसांची मालिश करा. सकाळी केसांना आणि डोक्याच्या त्वचेला लिंबाचा रस लावा. १५ मिनिटांनी केस शॅम्पूने धुवावे. यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.