कॉर्नफ्लेक्सचा धोका समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2016 01:32 PM2016-04-24T13:32:38+5:302016-04-24T19:02:38+5:30

कॉर्नफ्लेक्स खाताना या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे

Understand the risk of cornflakes | कॉर्नफ्लेक्सचा धोका समजून घ्या

कॉर्नफ्लेक्सचा धोका समजून घ्या

Next
ong>मक्यापासून बनवल्या जाणाºया कॉर्नफ्लेक्सच्या निर्मिती प्रक्रियेत त्यातील ‘बी’ जीवनसत्त्वे व खनिजे नष्ट होतात. त्यामुळे व्हिटॅमिन ‘बी’सह मक्यात न आढळणारे व्हिटॅमिन ‘डी’ व ‘बी १२’, लोह त्यात बाहेरून मिसळले जाते.

या प्रक्रियेस ‘फोर्टिफिकेशन’ म्हणतात. कॉर्नफ्लेक्समध्ये गोडव्यासाठी ‘कॉर्न सिरप’ घालतात. तसेच त्यात खाताना लोक आवडीप्रमाणे दूध, साखर, मध, गूळ वगैरे घालतात त्यामुळेही त्यातील साखर वाढते. त्यामुळे अशा कॉर्नफ्लेक्सचा अतिरेक केल्यास वजन वाढण्याचा धोका असतो.

शिवाय मधुमेहींनीही कॉर्नफ्लेक्स खाताना या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. प्रथिनांचे प्रमाण कॉर्नफ्लेक्समध्ये कमी असल्याने पोट कमी वेळ भरलेले राहते व लगेच भूक लागते. त्यामुळे कॉर्नफ्लेक्स फार आरोग्यदायी आहे हा गैरसमजच आहे.

त्यापेक्षा ओटमील वा गव्हापासून बनवलेले ‘व्हीट फ्लेक्स’ हा पर्याय चांगला. व्हीट फ्लेक्समध्ये प्रथिने अधिक असून त्यामुळे अधिक वेळ भूक लागत नाही. शिवाय जीवनसत्त्वे, खनिजेही त्यात जास्त असतात. कॉर्नफ्लेक्स, व्हीट फ्लेक्स यातले काहीही खाल्ले तरी साखरेचा वापर मर्यादितच बरा.

Web Title: Understand the risk of cornflakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.