सकाळी उठल्यावर 'या' चुका करणं टाळा, अन्यथा तारूण्य गमावून बसाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 02:04 PM2018-07-30T14:04:02+5:302018-07-30T14:04:13+5:30
सकाळी उठल्यावर आपण अनेक अशी कामं करतो की, जी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतात. सुरुवातीला आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण त्याच छोट्या गोष्टींमुळे पुढे जाऊन मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
सकाळी उठल्यावर आपण अनेक अशी कामं करतो की, जी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतात. सुरुवातीला आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण त्याच छोट्या गोष्टींमुळे पुढे जाऊन मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आपण रोज सकाळी उठल्यावर अशाच काही गोष्टी करतो की, ज्या आपल्याला क्षुल्लक वाटतात पण त्याचे परिणाम गंभीर असतात. जर तुम्ही दररोज सकाळी अंथरूणातून उठल्यावर अशाच काही गोष्टी करत असाल, तर त्यामुळे तुमचं तारूण्य लोप पावून, तुम्ही कमी वयात म्हातारे दिसू शकता....
गरम पाण्याने आंघोळ
सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्याने आंघोळ करण्याची अनेकांना सवय असते. पण असं केल्यानं तुमच्या चेहऱ्य़ावर कमी वयातच सुरकुत्या दिसू लागतात.
सकाळी नाश्ता न करणं
सकाळी घरातून घाई गडबडीत निघताना अनेक जण नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात. हेच कारण तुमच्यामध्ये कमी वयात म्हातारं दिसण्यासाठी कारणीभूत ठरतं. त्यामुळे शरीराला उर्जा मिळत नाही आणि त्यामुळे थकवा जाणवतो. अनेकदा यामुळे शरीराला आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
उशीरापर्यंत झोपणं
उशीरापर्यंत झोपल्यामुळे सकाळची सर्व कामं उशिरा होतात. त्यामुळे तुमच्यावर मानसिक ताण येतो. तुमच्या दिवसाचीच सुरुवात तणावानं होते. त्यामुळे शरीर असंतुलित राहतं आणि तुम्हाला पोटाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
धुम्रपान
काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या धुम्रपान करण्याची सवय असते. असं करणं त्या लोकांच्या आरोग्यासाठी घतक असतं. या सवयीमुळे अनेकांना कमी वयात वृद्धत्व येत.