अप्पर लिप्सवर येणारे केस दूर करण्यासाठी वापरा 'हे' नैसर्गिक उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 01:41 PM2019-01-07T13:41:30+5:302019-01-07T13:42:43+5:30
पुरूषांच्या चेहऱ्यावरील मिशी हे त्यांच्या रूबाबदारपणाचं प्रतिक मानलं जातं. पण हिच मिशी जर महिलांना दिसू लागली तर मात्र ती सौंदर्याच्या आड येते. अनेक महिलांना अप्पर लिप्सवर केस येतात.
पुरूषांच्या चेहऱ्यावरील मिशी हे त्यांच्या रूबाबदारपणाचं प्रतिक मानलं जातं. पण हिच मिशी जर महिलांना दिसू लागली तर मात्र ती सौंदर्याच्या आड येते. अनेक महिलांना अप्पर लिप्सवर केस येतात. यामुळे चेहऱ्याचा लूक बिघडतो. अनेक मुली अप्पर लिप्सवर आलेले हे केस काढून टाकण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी वॅक्स, थ्रेडिंग यांसारख्या अनेक उपायांचा आधार घेतात. परंतु हे सर्व उपाय तात्पुरते ठरतात. कालांतराने हे केस पुन्हा येतात. अनेकदा वॅक्सिंग आणि थ्रेडिंग केल्यामुळे त्वचेलाही नुकसान पोहोचतं. पण फायदा होतच नाही. पण काही घरगुती उपायांनी अप्पर लिप्सवर येणाऱ्या केसांपासून सुटका मिळवू शकता. जाणून घेऊया अशा काही उपायांबाबत...
हळद आणि बेसनाचा मास्क :
एक चमचा बेसनमध्ये एक चिमुटभर हळद मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये थोडं दूध एकत्र करा. तयार पेस्ट तुमच्या अप्पर लिप्सवर लावा. सुकल्यानंतर स्वच्छ करा. यामुळे केस नाहीसे होण्यास मदत होईल.
लिंबू आणि साखरेचं मिश्रण :
एक चमचा साखरेमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र करा. त्यानंतर ओव्हनमध्ये काही वेळासाठी गरम करा. साखर वितळल्यानंतर हे मिश्रण बाहेर काढून अप्पर लिप्स किंवा त्वचेवरील नको अलेले केसांवर लावा. काही दिवसांनंतर तुम्हाला फरक दिसून येईल.
दूध आणि हळदीचं मिश्रण :
हळद आणि दूधाचं मिश्रण फक्त चेहऱ्याची त्वचाच उजळवतं नाही तर त्वचेवरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठीही फायदेशीर ठरतं. तुम्ही हळदीमध्ये थोडंसं दूध एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट अप्पर लिप्सवर लावा. काही वेळ तसचं ठेवल्यानंतर धुवून टाका.
टिप : प्रत्येकाचीच त्वचा वेगवेगळी असते. अशातच काही पदार्थांची त्वचेला अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वरील उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.