चेहरा चमकवण्यासाठी घरच्या घरी तयार करा उडदाच्या डाळीचा फेस पॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 11:38 AM2018-10-02T11:38:22+5:302018-10-02T11:38:40+5:30

आपणा सर्वांच्याच घरात उडदाची डाळ मोठ्या आवडीने खाल्ली जाते. उडदाच्या डाळीचे अनेक आरोग्यदायी फायदे असण्यासोबत याचे चेहऱ्यासाठीही अनेक फायदे आहेत.

Urad Dal For Skin: 5 Amazing Home Remedies To Fight Skin Problems | चेहरा चमकवण्यासाठी घरच्या घरी तयार करा उडदाच्या डाळीचा फेस पॅक

चेहरा चमकवण्यासाठी घरच्या घरी तयार करा उडदाच्या डाळीचा फेस पॅक

googlenewsNext

आपणा सर्वांच्याच घरात उडदाची डाळ मोठ्या आवडीने खाल्ली जाते. उडदाच्या डाळीचे अनेक आरोग्यदायी फायदे असण्यासोबत याचे चेहऱ्यासाठीही अनेक फायदे आहेत. जर तुम्हीही चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी एखादा घरगुती पॅक शोधत असाल तर उडदाच्या डाळीचा खास पॅक तयार करु शकता. 

उडदाच्या डाळीचा फेस पॅक स्क्रबसारखा काम करतो जो चेहऱ्याची डेड स्कीन दूर करतो आणि चेहऱ्यावर ग्लो आणतो. इतकेच नाही तर हा पॅक लावल्याने चेहऱ्याचा रंगही उजळतो. जर तुम्हालाही कोणताही खर्च न करता घरच्या घरी फेस पॅक तयार करायचा असेल तर हा फेस पॅक नक्की ट्राय करा. 

कोरड्या त्वचेसाठी फेस पॅक

कोरड्या त्वचेसाठी हा फेस पॅक तयार करण्यासाठी २ मोठे चमचे उडीद डाळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ही डाळ बारीक करुन त्यात कच्च दूध मिश्रित करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून घ्या.

फेशिअल स्क्रब

चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी २ चमचे उडीद डाळीच्या पावडरमध्ये २ चमचे संत्र्याचा रस आणि २ चमचे चंदन पावडर मिश्रित करुन पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये तुम्ही गुलाब जल किंवा दूध टाकू शकता. हा फेस पॅक १० मिनिटे चेहऱ्यावर लावा त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून टाका.

टॅन रिमुव्हल पॅक

२ चमचे उडीद डाळ पाण्यात भिजत घाला आणि सकाळी बारीक करा. त्यात २ चमचे दही मिश्रित करुन पॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर १० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. 

Web Title: Urad Dal For Skin: 5 Amazing Home Remedies To Fight Skin Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.