/>आॅफिसमध्ये काम करणारा कर्मचारी फेसबुकचा वापर करीत, असल्याचे पाहून बॉस त्यांच्यावर ओरडतात. परंतू, यामुळे उलट कंपनीची उत्पादकता वाढते. हे एका सर्व्हेमधून समोर आले आहे. आॅफीसमध्ये थोडा ब्रेक घेत फेसबुकचा वापर केला तर कर्मचाºयाचा थकवाही दूर होतो. व उत्पादकता वाढण्यासही मदत होते. त्याकरिता आपण बॉस असेल तर कर्मचाºयावर रागावू नका. या सर्व्हेमधील ३४ टक्के लोकांनी सांगितले की, काम करतांना एक मेंटल ब्रेकसाठी ते सोशल मिडीयाचा वापर करतात. प्यू रिसर्च सेंटरने अमेरिकेमध्ये २००३ युवकांवर हे संशोधन केले आहे. सर्व्हेनुसार २७ टक्के जण मित्र व क टुंबासोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करतात. २४ टक्के प्रफेशनल कनेक्शन , २० टक्के हे माहिती होण्यासाठी कनेक्ट असतात. तर १७ टक्के हे संबंध चांगला राहावे. याकरिता ते सोशल मिडीयाचा वापर करतात.
Web Title: Use of Facebook increases productivity!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.