कमजोर नखांची समस्या दूर करण्यासाठी 'हा' उपाय करा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 03:14 PM2019-08-28T15:14:02+5:302019-08-28T15:14:15+5:30
नखं कमकुवत असतील तर ती कधीही तुटण्याचा धोका असतो. अनेकदा थोडा धक्का लागला तरिही नखं तुटून जातात. यामुळे अनेक महिला नखं वाढवत नाहीत किंवा नेलपेंट लावण्याचा शौकही पूर्ण करू शकत नाहीत.
नखं कमकुवत असतील तर ती कधीही तुटण्याचा धोका असतो. अनेकदा थोडा धक्का लागला तरिही नखं तुटून जातात. यामुळे अनेक महिला नखं वाढवत नाहीत किंवा नेलपेंट लावण्याचा शौकही पूर्ण करू शकत नाहीत. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही अनहेल्दी नखांची समस्या दूर करू शकता. उपाय तुमच्या स्वयंपाक घरातच आहे. स्वयंपाक घरात हमखास आढळून येणाऱ्या लसूण तुम्हाला मदत करेल.
लसणामध्ये अॅन्टीसेप्टिक गुणधर्म असतात. ज्यामुळे नखं कमकुवत असण्याचं कारण फंगस किंवा बॅक्टेरिया असतील तर ही समस्या दूर होण्यास मदत होईल. तसेच नखं हेल्दी होण्यासही मदत होईल. लसणामध्ये सेलेनियम नावाचं तत्व असतं. जे नखांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. तसेच यातील अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म नखं हेल्दी ठेवतात आणि कमकुवत होण्यापासून बचाव करतात.
असा करा वापर...
लसूण नखं मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे नखांचं आरोग्य राखण्यासोबतच नखं मजबुत करण्यासाठीही मदत होईल.
लसणाचं पाणी
एका बाउलमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या कापून टाका. 15 मिनिटांपर्यंट तसचं ठेवून त्यानंतर पाण्यातून बाहेर काढून टाका. या पाण्यात साबणाने हात धुवून 10 मिनिटांपर्यंत बुडवून ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने हात धुवून घ्या.
नेल पॉलिश आणि लसूण
लसणाच्या चार पाकळ्या घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका रिकाम्या नेटपेंटच्या बॉटलमध्ये ट्रान्स्परंट नेल पॉलिशसोबत एकत्र करा. बॉटल व्यवस्थित शेक करा आणि ब्रशच्या मदतीने नेल पॉलिशला नखांवर लावा. एक ते दोन तासांपर्यंत तसचं राहू द्या आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये हात धुवून घ्या. त्यानंतर नखांवर लावलेलं मिश्रण काढून टाका.
लसूण आणि ऑलिव्ह ऑइल
एका बाउलमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल घ्या आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या क्रश करून टाका. त्यामध्ये थोडा लिंबाचा रस एकत्र करा. तयार मिश्रण ब्रशच्या मदतीने नखांवर लावा आणि एका तासाने हात धुवून घ्या.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.