केस दाट करण्यासाठी असा करा कांद्याचा वापर, लागणार केवळ ५ मिनिटे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 10:07 AM2018-10-23T10:07:29+5:302018-10-23T10:07:47+5:30
बदलत्या वातावरणाचा त्वचा आणि केसांवरही वाईट परिणाम होतो. अशात केसांची आणि त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.
बदलत्या वातावरणाचा त्वचा आणि केसांवरही वाईट परिणाम होतो. अशात केसांची आणि त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण याकडे दुर्लक्ष करणे तुमची त्वचा आणि केसही डॅमेज करु शकतात. वातावरणासोबतच डाएटमध्ये झालेला बदल, योग्य आहार न घेमे, हार्मोन्समध्ये बदल इत्यादी कारणांनी त्वचा आणि केसांवर प्रभाव पडतो.
रुटीनमध्ये आपण एकवेळ आपल्या त्वचेची काळजी घेतो पण केसांबाबत विसरुन जातो. अशात केस तुटणे, गळणे आणि विरळ होणे स्वाभाविक आहे. पण जर तुम्ही तुमचे लांब, दाट केस परत हवे असतील तर रोज एक कांदा केसांवर वापरु शकता.
केसांसाठी कांदा
कांद्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात जे डोक्याच्या त्वचेवर होणारे कोणत्याही प्रकारच्या बॅक्टेरियाला दूर करतात. आणि केसांना पोषण देतात. नियमीत रुपाने केसांवर कांदा वापरला गेला तर काही दिवसातच केसांचा तुटणं आणि गळणं कमी होतं. सोबतच केसांची वाढही वाढते.
कसा वापराल कांदा?
- एका कांद्याचे बारीक तुकडे करा
- आता हे तुकडे फूड प्रोसेसरमध्ये टाकून त्याचे छोटे तुकडे करा
- पेस्ट तयार झाल्यावर कांद्याचं पाणी वेगळं काढा
- आता हे पाणी कॉटन किंवा बोटांच्या मदतीने डोक्याच्या त्वचेवर आणि केसांवर लावा
- १० ते १५ मिनिटे हे असंच राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस धुवा.
किती वेळा वापराल?
हा प्रयोग २ ते ३ आठवडे तितकाच करा जितक्यांदा तुम्ही केस धुता. जर आठवड्यातून तीनदा केस धुत असाल तर तितक्यांदा कांद्याचा वापर करा.