उन्हाळ्यात आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच डाळिंबाने असा मिळवा उजळ चेहरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:08 PM2018-05-19T13:08:51+5:302018-05-19T13:08:51+5:30
उन्हाळ्यात जर तुम्हाला चेहरा काळवंडणे, स्कीन अॅलर्जी, कोरडेपणा, पिंपल्स अशा समस्या होत असेल तर यावर डाळिंब रामबाण उपाय आहे. कारण डाळिंब खाल्लाने तुमच्या या समस्या दूर होतील.
उन्हाळ्यात डाळिंब हे फळ मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. डाळिंबं चवीला तर गोड असतंच पण त्यासोबतच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. इतकेच नाहीतर डाळिंब तुमच्या सौंदर्यातही भर घालण्यास मदत करतं. ते कसं हे खालीलप्रमाणे पाहुयात.
उन्हाळ्यात जर तुम्हाला चेहरा काळवंडणे, स्कीन अॅलर्जी, कोरडेपणा, पिंपल्स अशा समस्या होत असेल तर यावर डाळिंब रामबाण उपाय आहे. कारण डाळिंब खाल्लाने तुमच्या या समस्या दूर होतील.
1) काळपटपणा दूर करण्यासाठी
डाळिंबात असलेले अॅंटी ऑक्सीडेंट तत्व काळपटपणा दूर करण्यास मदत करतात. जर डाळिंबासोबत लिंबू मिश्रित करन चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग लगेच दूर होतात आणि तुमचा चेहरा आणखी उजळतो.
कसे बनवाल फेस पॅक ?
एक फ्रेश डाळिंब घ्या. त्याची पेस्ट तयार करा. त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून ते चांगले मिश्रित करुन घ्या. हे मिश्रण कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. कमीत कमी अर्धा तास हे तसंच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला याचा फायदा लगेच दिसेल.
2) गोरेपणा मिळवण्यासाठी
जर उन्हामुळे तुमच्या त्वचेवर कोरडेपणा आला असेल, चेहरा कोमेजला असेल आणि काळवंडला असेल तर डाळिंबात योगर्ट मिश्रित करुन चेहऱ्यावर लावा.
कसे बनवाल फेस पॅक ?
एका डाळिंबाच्या पेस्टमध्ये दोन ते तीन चमचे फ्रेश योगर्ट मिश्रित करा. आता हे मिश्रण बोटांच्या किंवा ब्रशच्या मदतीने चेहऱ्यावर, मानेवर लावा. ते तसेच 20 ते 25 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. याने तुम्हाला लगेच फरक दिसेल.