लांब नखांची काळजी घेण्यासाठी वापरा 'या' टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 06:14 PM2018-09-04T18:14:25+5:302018-09-04T18:15:21+5:30
सगळ्या महिला आपल्या नखांना फार जपतात. मोठ्या नखांमुळे महिलांच्या सौंदर्यात आणखी भर पडते. तसेच मोठ्या नखांवर नेल पॉलिश लावल्यामुळे नखांना वेगळा लूक मिळतो.
सगळ्या महिला आपल्या नखांना फार जपतात. मोठ्या नखांमुळे महिलांच्या सौंदर्यात आणखी भर पडते. तसेच मोठ्या नखांवर नेल पॉलिश लावल्यामुळे नखांना वेगळा लूक मिळतो. हल्ली नेल आर्टचा ट्रेन्ड आहे. त्यामुळे अनेक महिला लांब नखं ठेवणं पसंत करतात. जाणून घेऊयात काही टिप्सबाबत ज्यामुळे काही घरगुती उपायांनी लांब नखांची काळजी घेऊ शकतो.
1. आपल्या नखांना मजबूत ठेवण्यासाठी आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी सफरचंदाच्या व्हिनेगरचा वापर करा. यासाठी अर्धा कप सफरचंदाचं व्हिनेगर आणि अर्धा कप ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. त्यामध्ये 10 मिनिटांपर्यंत हात बुडवून ठेवा. त्यानंतर 5 मिनिटं हलक्या हाताने नखांवर मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने नखं स्वच्छ धुवून टाका.
2. ऑलिव्ह ऑइल नखांच्या मजबूतीसाठी फार फायदेशीर असतं. लिंबाच्या रसामध्ये थोडं ऑलिव्ह ऑइल मिक्स करून नखांना मसाज करा. यामुळे नखं चमकदर होण्यास मदत होईल.
3. नखांची देखभाल करण्यासाठी नारळाचं तेल वापरा नारळाचं तेल नखांसाठी फार फायदेशीर ठरतं. दररोज रात्री झोपण्यापूर्वी नारळाचं तेल नखांना लावून मसाज केल्यानंतर नखं मजबूत होण्यास मदत होते.