घरच्या घरी बीटाचा 'असा' वापर करून त्वचा आणि केसांचं सौंदर्य वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 04:57 PM2020-01-09T16:57:00+5:302020-01-09T16:57:05+5:30

प्रत्येकजण सुंदर त्वचा आणि आकर्षक चेहरा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो.

Uses of beetroot for skin and hairs | घरच्या घरी बीटाचा 'असा' वापर करून त्वचा आणि केसांचं सौंदर्य वाढवा

घरच्या घरी बीटाचा 'असा' वापर करून त्वचा आणि केसांचं सौंदर्य वाढवा

googlenewsNext

प्रत्येकजण सुंदर त्वचा आणि आकर्षक चेहरा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण सेलिब्रेटिंनीसारखा परफेक्ट लूक  येण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. पण  काही केल्या त्वचा सुंदर दिसत नाही कारण  ऑफिसच्या कामातून आणि घरातल्या कामातून स्वतःसाठी वेळ देता येत नाही.  जरी वेळ मिळालात तरी सारखं सारखं पार्लरला जाण्यासाठी वेळ मिळत नसतो.  सुट्टीच्या दिवशी पार्लरमध्ये वेळ न घालवता सुद्धा तुम्ही  सुंदर त्वचा मिळवू शकता. कारण बाजारात सहज उपलब्ध  असलेल्या काही घटकांचा वापर करून तुम्हाला त्वचेची काळजी घरच्याघरी घेता येईल.

Image result for beetroot

अनेकदा बाहेरच्या महागड्या क्रिम्समध्ये असलेले केमिकल्स आपल्या त्वचेला  नुकसानकारक ठरू शकतात.  तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण कॉस्मेटीक्सच्या  वापरामुळे तुमचा चेहरा खराब होऊन  कमी वयातच वयस्कर  दिसायला लागता. पण एकदा चेहरा आणि त्वचेचे नुकसान झाल्यानंतर त्वचा आधीसारखी होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो.  त्यामुळे तुम्ही  आपल्या त्वचेचं सौदर्य खुलवण्यासाठी  नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास त्वचेचं होणारं मोठं नुकसान टळेल.  शिवाय नैसर्गिक घटकांचा वापर केल्यामुळे शरीराला सुध्दा पोषण मिळेल. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत बीट खाण्याचे फायदे काय आहेत. 

सर्वसाधारणपणे बीटाचा वापर खाण्यासाठी केला जातो. बीटाचे त्वचेला अनेक फायदे होतात. जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल तर बीटाचे सेवन तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. थकवा कमी करण्यासाठी बीट फायदेशीर ठरतं असतं.  रक्त वाढवण्यासाठी तसंच  रक्तशुध्दीकरणासाठी  बीट उत्तम ठरतं. बीट मध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असून रोज खाल्ल्याने विविध आजार तर दूर होतील शिवाय शरीर सुदृढ होण्यासही मदत होते. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियममधील समृद्ध फोलिक अ‍ॅसिड तसेच विटॅमिन ‘सी’चे चांगले स्त्रोत आहे.


मासिक पाळीच्या समस्या दूर होतात

मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि यावेळी त्रास होत असेल तर बीट खाल्याने त्यापासून सूटका होते. बीटमध्ये फॉलिक एसिड असतं. जे गर्भवती महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी फायदेशीर असतं. रक्त वाढवण्यात बीट फायदेशीर ठरतं.  

रक्तदाब

उच्च रक्तदाबसाठी घरगुती उपाय एक बीट लहान तुकड्यामध्ये कापा.  बीटाची ३ ताजी पानं कापून यात मिक्स करा. त्याचा रस काढा. हे १०० मिली बीटाचे रस दररोज दिवसातून २ वेळा प्या. हा उपाय उच्च रक्तदाब सामान्य करतो. ( हे पण वाचा: फेअरनेस क्रिममुळेही होऊ शकते अ‍ॅलर्जी, जाणून घ्या कारण....)

 त्वचेवर असा करा वापर 

त्वचेवर बीटाचा वापर करण्यासाठी  एलोवेरा जेल आणि २ चमचे व्हिटामीन ई च्या कॅप्सूल आणि बदामाचं तेल एकत्र करा. त्यात एक साल काढलेल्या बीटाचा घट्टरस घाला . हे मिश्रण तयार झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेऊन द्या. हे मिश्रण १५ दिवसांपर्यंत फ्रिजमध्ये राहू शकतं. ही क्रिम आपल्या हातांनी त्वचेवर  गोलाकार फिरवा.  हिवाळ्यात  चेहरा खराब होऊ नये म्हणून इतर केमिकल्सयुक्त क्रिम वापरण्यापेक्षा बीटाच्या घरगुची क्रिमचा वापर करा. यामुळे तुमची त्वचा गुलाबी दिसेल तसंच  मऊ आणि मुलायम दिसेल.  याच मिश्रणात व्हिनेगर घालून जर तुम्ही  पेस्ट तयार केली आणि याचा वापर केसांवर केला तर कोंडा होण्याची समस्या दूर होईल. (हे पण वाचा: पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे उपाय...)

Web Title: Uses of beetroot for skin and hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.