Valentine Day : 'या' ब्युटी टिप्स वापराल तर तुमच्यावर खिळून राहील पार्टनरची नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:51 PM2019-02-06T13:51:36+5:302019-02-06T13:52:00+5:30
'व्हॅलेंटाइन डे' अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. असातच तुम्हीही तुमच्या व्हॅलेंटाइनसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करत आहात का? तर तुम्हाला आज आम्ही काही टिपस् सांगणार आहोत.
'व्हॅलेंटाइन डे' अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. असातच तुम्हीही तुमच्या व्हॅलेंटाइनसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करत आहात का? तर तुम्हाला आज आम्ही काही टिपस् सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही सुंदर दिसू शकता. अनेकदा आपण सुंदर दिसण्यासाठी महागड्या पार्लर ट्रिटमेंट्सचा आधार घेत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या घरातच असे काही पदार्थ असतात. ज्यांचा वापर करून अगदी कमी वेळात त्वचेचं सौंदर्य चमकदार करू शकता.
तुम्ही सिंगल असा किंवा कमिटेड, मुलांना इम्प्रेस करण्यासाठी चेहऱ्यावर ग्लो येणं अत्यंत आवश्यक आहे. हिच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला 5 ब्यूटी टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा आजापासूनच वापर करण्यास सुरुवात करा. व्हॅलेंटाइन डेपर्यंत तुमचा चेहरा तुम्हाला नॅचरली ग्लो करण्यास सुरुवात करेल. कदाचित यामुळे तुम्हाला मेकअप करण्याचीही गरज भासणार नाही.
1. दुधाची साय
अनेक लोकांना दुध आवडत नाही किंवा दूधावरील साय आवडत नाही. परंतु व्हॅलेंटाइन डे आधी जर तुम्हाला सॉफ्ट, तजेलदार त्वचा पाहिजे असेल तर निदान ही साय न खाता चेहऱ्यावर लावणं फायदेशीर ठरतं. दूधाची साय चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते. ही साय तेलकट असते त्यामुळे चेहरा मुलायम होतो, तसेच चेहऱ्याचा रंगही उजळण्यास मदत होते.
असा करा वापर :
दूधाची साय घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद एकत्र करून कॉटन बॉल्सच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी चेहऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
2. बेसन
बेसन, चंदन, हळद इत्यादी पदार्थ एकत्र करून एक मिश्रण तयार करा आणि व्हॅलेंटाइन डेच्या आधी कमीत कमी दोन वेळा याचा वापर करा. तुम्ही आवश्यक असेल तर दररोजही चेहऱ्यावर हे मिश्रण लावू शकता. या फेस पॅकमध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी नैसर्गिक असल्यामुळे याचे कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत. त्यामुळे दररोज म्हटलं तरी हा फेसपॅक वापरू शकता.
3. गुलाब पाणी
व्हॅलेंटाइन डेसाठी तुम्हाला स्किनवर इंस्टेंट ग्लो पाहिजे असेल तर त्या दिवशी तयार होण्याआधी एक छोटासा उपाय करा. 2 ते 3 कॉटन बॉल्स गुलाब पाण्यामध्ये भिजवून फ्रीजमध्ये ठेवून द्या. काही वेळानंतर त्या कॉटन बॉल्सनी तुमच्या चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी मसाज करा. लक्षात ठेवा की, मसाज करण्याआधी तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. गुलाब पाण्याने चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.
4. स्क्रबिंग
व्हॅलेंटाइन डेच्या एक रात्र आधी चेहऱ्यावर स्क्रब करा. आपल्या स्किन टाइपनुसार, स्क्रबची निवड करा. स्क्रब करताना हातांना चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये फिरवा. ही स्क्रब करण्याची योग्य पद्धत आहे. स्क्रब केल्यानंतर स्किन टाइपनुसार, फेस पॅक लावा आणि 10 मिनिट ठेवल्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. सकाळ उठल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो दिसून येईल.
5. मुलतानी माती
जर तुमची स्किन ऑयली आहे, तर व्हॅलेंटाइन डेच्या एक रात्री आधी चेहऱ्यावर मुलतानी माती लावा. 10 ते 15 मिनिट ठेवल्यानंतर चेहरा धुवून टाका. जर व्हॅलेंटाइन डेसाठी वेळ असेल तर तुम्ही 2 दिवसांचा गॅप ठेवूनही चेहऱ्यावर अप्लाय करू शकता. मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात आणि फ्रेश लूक मिळण्यासही मदत होते.