धावण्याचे विविध फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2016 08:54 AM2016-05-15T08:54:50+5:302016-05-15T14:24:50+5:30
पळण्यासारखा सोपा व्यायाम नाही. ना त्यासाठी विशेष प्रशिक्षण लागते ना, महागड्या वस्तू.
र ज सकाळी ताज्या हवेत पळण्याचा व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभ दायक असते. एका तर आपले शरीर सुडौल होण्यास त्यामुळे मदत होतेच पण त्यासोबतच आपली आत्मऊर्जा व मानसिक आरोग्यदेखील सुधारते.
पळण्यासारखा सोपा व्यायाम नाही. ना त्यासाठी विशेष प्रशिक्षण लागते ना, महागड्या वस्तू. संशोधनात असे दिसून आले की, रोज केवळ 20 मिनिट जरी पळाले तरी आपल्या एकंदर आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.
त्यामुळे जर तुम्ही रोज पळण्याचा व्यायाम करत नसाला तर आम्ही तुम्हाला काही प्रेरणादायी फायदे सांगणार आहोत जे वाचून नक्कीच सकाळचा आळस सोडून तुम्ही ‘जॉगिंग’ला जाणार.
बौद्धिक आरोग्य :
उतार वयात वाढत्या वयानुसार आपली बौद्धिक क्षमता आणि आरोग्या कमी होऊ लागते. अल्झायमर्ससारखा आजार तर फार कॉमन आहे. त्यामुळे मेंदूच्या पेशींची क्षमता घटते. पळण्यामुळे अल्झायमर्स जरी बरा होत नसला तरी पेंशीचे घट रोखण्यामध्ये त्यामुळे खूप मदत होते.
तणावमुक्ती :
आपल्या धकाधकीच्या आयुष्यात स्ट्रेस वाढला आहे. पळण्यामुळे नोरेपाईनफ्राईनची मात्रा वाढते. हे संयुग आपल्या मेंदू व शरीराला एकताळ्यात ठेवते.
आत्मविश्वास :
पळण्यामुळे आपला आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढतो.
मूड सुधारतो :
तुमचा मूड जर खराब असेल तर लगेच घराबाहेर पडा आणि पळा. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, पळण्यामुळे आपला मुड सुधारतो.
झोप चांगली येते :
आपल्याला किमान 7-8 तासांची झोप गरजेची असते. पळाल्यामुळे आपल्या झोपेचे वेळापत्रक व्यस्थित होते. नियमित पळाल्यामुळे चांगली झोप लागते.