​अति जास्त प्रमाणात चांगले कोलेस्टेरॉलसुद्धा धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2016 12:34 PM2016-08-12T12:34:09+5:302016-08-12T18:04:09+5:30

हाय-डेन्सिटी लिपोप्रोटिन (एचडीएल) कोलेस्टेरॉल जर शरीरात जास्त प्रमाणात असेल तर अवेळी मृत्यू होण्याची शक्यता वाढते.

Very high cholesterol is also dangerous | ​अति जास्त प्रमाणात चांगले कोलेस्टेरॉलसुद्धा धोकादायक

​अति जास्त प्रमाणात चांगले कोलेस्टेरॉलसुद्धा धोकादायक

Next
ि तेथे माती. मराठीमधील ही म्हण वैद्यकशास्त्रातही लागू पडते. कोणतीच गोष्ट, मग ती चांगली का असेना, अति जास्त प्रमाणात असणे तोट्याचे ठरू शकते. नव्या संशोधनाअंती असे दिसून आले की, हाय-डेन्सिटी लिपोप्रोटिन (एचडीएल) कोलेस्टेरॉल, जे स्ट्रोक व हृदयविकाराचा धोका कमी करते, ते जर शरीरात जास्त प्रमाणात असेल तर अवेळी मृत्यू होण्याची शक्यता वाढते.

आरोग्यासाठी लाभदायक समजले जाणारे कोलेस्टेरॉलदेखील अधिक जास्त प्रमाणात असेल किंवा गरजेपेक्षा कमी असले तर व्यक्तीला मृत्यूचा धोका संभावतो. संशोधकांच्या मते, योग्य प्रमाणात एचडीएल कोलेस्टेरॉल असेल तर आयुर्मान वाढण्यात हातभार लागतो.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल आॅफ मेडिसिनमधील सहायक प्राध्यापक झियाद अल-अली यांनी सांगितले की, आम्ही केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष खरोखरंच आश्चर्यकारक आहेत. पूर्वी मानले जात असे की, चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढली तर आरोग्यास लाभ होतो. त्यामुळे एचडीएल कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी आणि अवेळी मृत्यूचा संबंध असतो हे समोर येणं थोडसं शॉकिंग होतं.’

या संशोधनामध्ये सुमारे एक लाख सत्तर हजार पुरुषांच्या किडनी फंक्शन आणि एचडीएल कोलेस्टेरॉल पातळीचा अभ्यास करण्यात आला. धमण्यांमधील हानीकारक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचे काम एचडीएल करत असते. त्याचे अति जास्त किंवा अति कमी प्रमाण असेणे आरोग्यासाठी घातक आहे.

Web Title: Very high cholesterol is also dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.