ब्युटी इडस्ट्रिमध्ये धुमाकूळ घालत आहेत 'या' 3 गोष्टी; फायदे वाचून तुम्हीही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 12:57 PM2019-08-17T12:57:52+5:302019-08-17T13:00:57+5:30
आपलं सौंदर्य जपण्यासाठी आपण अनेक उपया करतो. तसेच ब्युटी इडस्ट्रिमध्येही अनेक नवनवीन गोष्टी सतत ट्रेन्ड करत असतात. ब्युटी इंडस्ट्रिच्या रिपोर्टनुसार, सध्या तीन गोष्टी ब्युटी इंडस्ट्रिमध्ये धुमाकूळ घालत आहेत.
आपलं सौंदर्य जपण्यासाठी आपण अनेक उपया करतो. तसेच ब्युटी इडस्ट्रिमध्येही अनेक नवनवीन गोष्टी सतत ट्रेन्ड करत असतात. ब्युटी इंडस्ट्रिच्या रिपोर्टनुसार, सध्या तीन गोष्टी ब्युटी इंडस्ट्रिमध्ये धुमाकूळ घालत आहेत. सौंदर्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्यामुळे त्यांची मागणी सतत वाढत आहे. जर तुम्हाला मेकअप प्रोडक्टमध्ये या गोष्टी आढळल्या तर अजिबात हैराण होऊ नका. आज आम्ही तुम्हाला या तीन गोष्टींबाबत सांगण्यासोबतच त्यांचे फायदेही सांगणार आहोत. जाणून घेऊया या तीन गोष्टींबाबत सविस्तर...
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी ब्युटी इंडस्ट्रीमध्ये व्हिटॅमिन सी म्हणजे, त्वचेसाठी वरदान समजलं जातं. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये व्हिटॅमिन सीचा वापर करण्यात येतो. साधारणतः मॉयश्चरायझरस सीरम आणि क्लींजर्समध्ये व्हिटॅमिन सीचा सर्रास वापर करण्यात येतो. व्हिटॅमिन सी इन्फ्यूज्ड सीरम त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. या अॅन्टीऑक्सिडंटमध्ये ब्रायटनिंग, क्लींजिंग आणि अॅन्टीएजिंग प्रॉपर्टिज असतात. तसेच हे त्वचेचं कोलेजन बूस्ट करण्यासाठीही मदत करतं. हायपर पिगमेंटेशन, वाढत्या वयाच्या समस्या दूर करण्यासाठी तसेच त्वचेचा ग्लो बाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी मदत करतं.
ह्यलुरोनिक अॅसिड
ह्यलुरोनिक अॅसिड आपल्या शरीरामध्येही तयार होत असतं. हे अॅसिड स्किन टिश्यूज हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. हे जास्तीत जास्त मॉयश्चरायझर्स, क्लींजर्स, सीरम किंवा आयक्रिम्समध्ये वापरण्यात येतात. सध्या फाउंडेशनमध्ये ह्यलुरोनिक अॅसिड आढळून येतं. जर तुमची त्वचा ड्राय असेल तर तुमच्यासाठी ह्यलुरोनिक अॅसिड वरदान ठरतं.
सीबीडी ऑइल
सीबीडी ऑइल किंवा कॅनाबिनॉइड्स कॅनबिसच्या झुडुपांमध्ये आढळून येतं. ते त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. फेस ऑइल्स म्हणून वापरण्यात येणाऱ्या इतर ऑइल्सपेक्षा सीबीडी ऑइल सरस ठरतं. त्वचेशी निगडीत अनेक समस्या दूर करण्यासाठी हे ऑइल फायदेशीर ठरतं. यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळून येतं. सीबीडी ऑइल त्वचेवरील सुरकुत्या दूर करून एजिंग साइन्स दूर करण्यासाठी मदत करतं.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.