उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतं व्हिटॅमिन-सी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 03:16 PM2019-03-15T15:16:01+5:302019-03-15T15:16:39+5:30

सुर्याच्या प्रखर किरणांमुळे आरोग्यासोबतच त्वचेचीही हानी होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीरासोबतच त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरतं.

Vitamin c protects the skin from heat in many ways | उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतं व्हिटॅमिन-सी!

उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतं व्हिटॅमिन-सी!

Next

(Image Credit : Daily Mail)

सुर्याच्या प्रखर किरणांमुळे आरोग्यासोबतच त्वचेचीही हानी होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीरासोबतच त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. त्वचेवर सनस्क्रिन लावणं आणि बाहेर पडताना स्कार्फचा वापर करण्याव्यतिरिक्त शरीराला आतूनही सुरक्षा देणं आवश्यक असत. त्यामुळे आहारामध्ये अनेक व्हिटॅमिन्सचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. विटामिन-सी आपल्या शरीराला यूवी किरणांपासून किवा सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव करण्यासाठी मदत करतं. तुम्हाला व्हिटॅमिन सी प्रत्येक प्रकारच्या सिट्रस फळांमध्ये म्हणजेच, लिंबू, संत्री, पेरू, मोसंबी इत्यादींमध्ये मिळेल. जाणून घेऊया व्हिटॅमिन-सीचं सेवन केल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत...

अ‍ॅन्टीऑक्सिडंटप्रमाणे काम करतं व्हिटॅमिन-सी 

व्हिटॅमिन-सीमध्ये मुबलक प्रमाणात अ‍ॅन्टीऑक्सिडंट असतात. फ्री रॅडिकल्सपासून बचाव करण्यासाठी तुमच्या शरीराला अ‍ॅन्टीऑक्सिडंटची गरज असते. त्यामुळे त्वचा सूर्याच्या प्रखर किरणांसोबतच प्रदूषणापासून बचाव करू शकते. त्यामुळे हे अत्यंत आवश्यक आहे की, तुम्ही व्हिटॅमिन-सीयुक्त पदार्थांचा उन्हाळ्यातही आहारात समावेश करावा. 

कोलेजनचं उत्पादन करतं व्हिटॅमिन-सी

शरीराला व्हिटॅमिन-सीची आवश्यकता अजिबात भासत नाही. कारण हे कोलेजनचं उत्पादन करतं. कोलेजन एक प्रकारचं प्रोटीन असतं, जे त्वचमध्ये मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
 
त्वचेची देखभाल करण्यासाठी व्हिटॅमिन सी

जर तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार आणि मुलायम करायची असेल तर त्यासाठी व्हिटॅमिन-सीचं सेवन करणं आवश्यक ठरतं. 

उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी आहे आवश्यक 

व्हिटॅमिन-सी जास्त उन्हाळ्यात आपल्या शरीराला त्याच्यानुसार एडजस्ट करतं. जसं-जसं तापमान वाढतं, तसचं आपल्या शरीराला त्यानुसार अ‍ॅडजस्ट व्हावं लागतं. त्यामुळे शरीर जेवढं जास्त तापमानासोबत अ‍ॅडजस्ट होइल तेवढं आरोग्य उत्तम राहण्यासाठी ते फायदेशीर ठरतं. 

अनेक रोगांवर उपचार करतं व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन-सीमध्ये रोगांचा इलाज करण्याची शक्ती असते. ही सनबर्न आणि उन्हाळ्यामध्ये अनेक रोगांवर उपचार करते. 

सन बर्नपासून उपचार करण्यासाठी व्हिटॅमिन सीचं सेवन

अनेकदा लोकांना समजत नाही की, सन बर्न त्वचेला कितपत नुकसान पोहोचवतं. यामुळे कॅन्सर होण्याचा धोकाही वाढतो. परंतु व्हिटॅमिन-सीचं अधिक सेवन केल्याने तुम्ही या गोष्टी टाळू शकता. 

Web Title: Vitamin c protects the skin from heat in many ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.