त्वचेवरील सुरकुत्यांनी हैराण आहात? 'हा' आहे सर्वात बेस्ट उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 11:48 AM2018-11-20T11:48:46+5:302018-11-20T11:49:17+5:30
वाढत्या वयासोबत त्वचेवर सुरकुत्या येणे सामान्य बाब आहे. पण अलिकडे चुकीच्या सवयींमुळे कमी वयातही त्वचेवर सुरकुत्या बघायला मिळतात.
(Image Credit : www.thelist.com)
वाढत्या वयासोबत त्वचेवर सुरकुत्या येणे सामान्य बाब आहे. पण अलिकडे चुकीच्या सवयींमुळे कमी वयातही त्वचेवर सुरकुत्या बघायला मिळतात. त्यामुळे अनेकांना कमी वयातच वृद्ध झाल्याचं वाटतं. पण या सुरकुत्या दूर करण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या आहारात थोडा बदल करुन यात व्हिटॅमिन 'सी' चा समावेश करावा लागेल. असे केले तर तुमची त्वचा तजेलदार आणि सुंदर दिसेल. व्हिटॅमिन सी मधील अॅंटी-ऑक्सिडेंट शरीरातील फ्रि रॅडिकल्ससोबत लढतात. फ्रि रॅडिकल्समुळे त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात.
काय करावे?
हे सत्यच आहे की, चांगल्या आहारामुळे केवळ तुम्ही फिट राहता असे नाही तर तुमची त्वचाही निरोगी राहते. त्वचा सुंदर बनवण्यासाठी किंवा त्यावर नैसर्गिक ताजेपणा आणण्यासाठी लोक कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा करतात. पण काही नैसर्गिक आणि सोप्या उपायांनीही त्वचेवरील सुरकुत्या दूर केल्या जाऊ शकतात. व्हिटॅमिन सी असलेले जास्तीत जास्त पदार्थ आणि फळं खाल्ले तर सहजपणे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या दूर होतील आणि तुमची त्वचा अधिक आकर्षक होईल.
अॅंटी-ऑक्सिडेंटने भरपूर व्हिटॅमिन 'सी'
व्हिटॅमिन 'सी' मध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आढळतं. कोलाजेन प्रोटीन हे त्वचा लवचिक ठेवण्यास मदत करतं आणि त्वचेवर सुरकुत्या येण्यापासून बचाव केला जातो. जनरली आपण जे काही खोत त्याचा आपल्या त्वचेवर प्रभाव पडतो. ज्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात त्यांनी सुरकुत्या अधिक येतात आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खाल्ल्याने सुरकुत्या कमी होतात.
काय सांगतो रिसर्च?
संत्री या फळात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. त्यासोबतच आहारामध्ये व्हिटॅमि ए, बी, सी आणि ई यांचाही समावेश करायला हवा. व्हिटॅमिन ई मुळे त्वचेच्या पेशी तयार होण्यास मदत होते आणि याने त्वचेला मजबूती मिळते. नुकत्याच झालेल्या एका शोधानुसार, हे सिद्ध झालं आहे की व्हिटॅमिन सी सुरकुत्या दूर करण्यासाठी सर्वात फायदेशीर आहे. म्हणजे जे लोक जास्तीत जास्त व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खातात त्यांना सुरकुत्यांची समस्या कमी होते.
व्हिटॅमिन सी ला एस्कोरबिक अॅसिड असेही म्हटले जाते. हे वेगवेगळ्या फळांमध्ये आमि भाज्यांमध्ये आढळतं. हिरव्या मिरच्या, फ्लॉवर, स्प्राउट्स, संत्री, कीवी फ्रूट, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, हिरव्या भाज्या, पपई, आंबे, कलिंगड, रेस्पबेरी आणि अननस इत्याही फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात.