कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे कमी वयात पांढरे होतात केस? वाचाल तर योग्य उपाय कराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 12:55 PM2024-11-06T12:55:08+5:302024-11-06T12:55:47+5:30

White Hair : कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे केस कमी वयात पांढरे होतात. जर तुम्हाला ही बाब माहीत असेल तर तुम्ही योग्य ते उपाय करून ही समस्या दूर होऊ शकते. 

Vitamin d and vitamin b12 deficiency can cause white hair | कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे कमी वयात पांढरे होतात केस? वाचाल तर योग्य उपाय कराल!

कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे कमी वयात पांढरे होतात केस? वाचाल तर योग्य उपाय कराल!

White Hair : सामान्यपणे केस पांढरे होणं हा वय वाढत असल्याचा संकेत मानला जातो. मात्र, आजकाल महिला असो वा पुरूष कमी वयातच त्यांचे केस पांढरे होत आहेत. कमी वयात केस पांढरे होण्याचं कारण शरीरात पोषक तत्वांची कमतरताही असू शकतं. अशात तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे केस कमी वयात पांढरे होतात. जर तुम्हाला ही बाब माहीत असेल तर तुम्ही योग्य ते उपाय करून ही समस्या दूर होऊ शकते. 

कोणते व्हिटॅमिन्स महत्वाचे?

एक्सपर्टनुसार व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी१२ असे दोन व्हिटॅमिन्स आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात. अशात या दोन्ही व्हिटॅमिन्सची कमतरता भरून काढण्यासाठी काय करावे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून कमी वयात पांढरे झालेले तुमचे केस पुन्हा काळे व्हावेत.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ नये यासाठी पुरेसं व्हिटॅमिन मिळवणं गरजेचं असतं. सूर्य किरणांमधून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकतं. अशात रोज सकाळी १५ ते २० मिनिटे उन्ह घेतल्याने तुम्हाला भरपूर व्हिटॅमिन डी मिळू शकतं. त्याशिवाय दूध, दुधापासून तयार वेगवेगळे पदार्थ, मशरूम, अंडी आणि फॅटी फिशमधूनही तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकतं.

व्हिटॅमिन बी१२

व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता भरून काढणंही फार गरजेचं असतं. या व्हिटॅमिनने हेअर फॉलिकल्सला फायदा मिळतो. अशात हे व्हिटॅमिन मिळवण्यासाठी तुम्ही अंडी, दूध, दुधाचे पदार्थ, मांस आणि मासे यांचं सेवन करू शकता.

इतर काही सोपे उपाय

पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. खोबऱ्याच्या तेलात थोडा लिंबाचा रस टाकून या तेलाने डोक्याची मालिश करा. हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता. याने पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत मिळेल.

मेहंदी आणि इंडिगो

मेहंदी आणि इंडिगो केसांवर लावल्याने पांढरे केस काळे होतात. या नॅचरल डायने केस जास्त काळ काळे राहतात. हा उपाय करताना मेहंदी आणि इंडिगो समान प्रमाणात घ्यावे.

ऑलिव्ह ऑईल आणि आवळा पावडर

४ ते ५ चमचे ऑलिव्ह ऑईल गरम करा आणि या तेलात एक चमचा आवळा पावडर मिक्स करा. तसेच यात एक चमचा मेथी पावडरही टाका. काही वेळ गरम झाल्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्या. या तेलाने आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांवर मालिश केल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत मिळेल. 

Web Title: Vitamin d and vitamin b12 deficiency can cause white hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.