कपाळावरील सुरकुत्या नेहमीसाठी होतील गायब, करा हे घरगुती पाच उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 12:12 PM2019-06-22T12:12:49+5:302019-06-22T12:34:39+5:30
अनेकजण कमी वयातच कपाळावर पडत असलेल्या सुरकुत्यांमुळे हैराण असतात. कारण कपाळावर पडणाऱ्या सुरकुत्यांमुळे सुंदरता प्रभावित होते.
अनेकजण कमी वयातच कपाळावर पडत असलेल्या सुरकुत्यांमुळे हैराण असतात. कारण कपाळावर पडणाऱ्या सुरकुत्यांमुळे सुंदरता प्रभावित होते. तसेच कमी वयातच कपाळावर सुरकुत्या दिसणं ही एक गंभीर समस्या देखील असू शकते. अनेकदा तणाव, चेहऱ्याची योग्य काळजी न घेणे, थकवा, पौष्टिक आहार न घेणे या गोष्टींमुळेही कमी वयातच सुरकुत्या येऊ लागतात. या सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला आणि तरूणी वेगवेगळे ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरतात. पण याने फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होतं. अशात काही नैसर्गिक उपायांच्या माध्यमातून या सुरकुत्या कमी केल्या जाऊ शकतात.
का पडतात सुरकुत्या?
वाढत्या वयामुळे आणि त्वचेतील कोलेजन कमी झाल्याने कपाळावर सुरकुत्या पडतातय
पराबॅंगनी किरणांच्या संपर्कात आल्याने
धुम्रपान आणि मद्यसेवनामुळे
असंतुलित आहारामुळे
पाणी कमी पिणे
तणाव आणि डिप्रेशन
झोप कमी घेणे
आनुवांशिक कारण
करा हे उपाय
खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याच्या तेलाचे काही थेंब नियमित कपाळावर लावा आणि थोडा वेळ मालिश करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी ही प्रक्रिया करा. खोबऱ्याच्या तेलाने त्वचा मॉइश्चराइज होते. त्वचा निरोगी आणि टवटवीत राहते. यातील अॅंटी-ऑक्सिडेंट गुण फ्री रेडिकल्सला दूर करतात. हे फ्री रेडिकल्स त्वचेत जमा होऊन नुकसान पोहोचवतात. याने सुरकुत्या वाढतात.
एरंडीचं तेल
एरंडीचं तेल कपाळावर सुरकुत्या असलेल्या भागात लावा. रात्रभर तेल कपाळावर तसंच लावून ठेवा. तसेच रात्री किंवा दिवसा कपाळावर हे तेल दोन ते तीन वेळा लावा. एरंडीच्या तेलात रिकिनोइलिक अॅसिड असतं. जे एक चांगलं स्कीन कंडिशनिंग तत्व आहे. तसेच या तेलात भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे कपाळाची त्वचेवरील सुरकुत्या दूर ठेवण्यास मदत करतात.
आंबट फळांचा रस
लिंबाचा रस घ्या आणि त्यात कॉटन बॉल बुडवून कपाळावर लावा. त्वचा संवेदनशील असेल तर लिंबाच्या रसा एवढंच पाणी त्यात टाका. कपाळावर लावल्यावर रस सुकू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. तसेच तुम्ही लिंबाची, संत्र्यांची साल पेस्ट करून आणि त्यात गुलाबजल मिश्रित करून फेस पॅक तयार करू शकता. आंबट फळांचं सेवन करणं सुद्धा फायदेशीर ठरतं. लिंबाचा रस दिवसातून चार वेळा कपाळावर लावा. याने फायदा दिसेल.
ऑलिव्ह आइल
१० मिनिटांसाठी हलकं गरम ऑलिव्ह आइल तेलाने कपाळाची मसाज करा. मसाज करताना बोटे वर आणि खाली अशी फिरवा. चांगल्या परिणामासाठी यात काही खोबऱ्याच्या तेलाने थेंब टाका. रोज एक किंवा दोनदा ही प्रक्रिया करा. खोबऱ्याच्या तेलात ऑलिव्ह ऑइल मिश्रित करून एक चांगलं मॉइश्चराइजर तयार केलं जाऊ शकतं.
अॅलोव्हेरा जेल
अॅलोव्हेरा जेलमध्ये सुद्धा कपाळावरील सुरकुत्या दूर करण्याचे गुण असतात. दोन चमचे अॅलोव्हेरा जेल, एका अंड्याचा पांढरा भाग मिश्रित करा. हे मिश्रण कपाळावर लावा. १० ते १५ मिनिटांनी कपाळ पाण्याने स्वच्छ धुवा. अॅलोव्हेरा आणि अंड्याच्या पांढऱ्या भागात व्हिटॅमिन ई असतं. याने त्वचेला पोषण मिळत आणि त्वचा कोमल होते. यात मॅलिक अॅसिड असतं जे फाइन लाइन्सला ठीक करतं.