पुन्हा तरुण दिसायचंय? 'हे' वापरा आणि सुरुकुतलेल्या त्वचेपासून सुटका मिळवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 03:28 PM2021-06-20T15:28:06+5:302021-06-20T15:28:45+5:30

लसणाचे सौंदर्यवर्धक फायदे देखील आहेत. लसूण आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. लसणाच्या वापरामुळे तुम्ही काही दिवसांतच तरुण दिसू लागता. पाहा काय फायदे आहेत लसणाचे...

Want to look younger again? Use 'this' and get rid of wrinkled skin ... | पुन्हा तरुण दिसायचंय? 'हे' वापरा आणि सुरुकुतलेल्या त्वचेपासून सुटका मिळवा...

पुन्हा तरुण दिसायचंय? 'हे' वापरा आणि सुरुकुतलेल्या त्वचेपासून सुटका मिळवा...

Next

आपण लसणाचा वापर जेवणात करतो. हे आरोग्यदायी लसूण आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच लसणाचे सौंदर्यवर्धक फायदे देखील आहेत. लसूण आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त हे मुरूमं, सुरकुत्या, ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. लसणाचा वापर कसा करावा जाणून घेऊ या.

वाढत्या वयाची लक्षणे कमी करण्यासाठी
एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळा. त्यात लसणाची एक पाकळी टाका. हे मिश्रण प्या. सरत्या वयाचे लक्षणे दिसण्याची कमी होतील.

ब्लॅक हेड्स कमी करत
या साठी १/२ टोमॅटो आणि २ लसणाच्या पाकळ्या घेऊन त्यांना एकत्र मॅश करा. त्याची पेस्ट बनवा. ही बनवण्यासाठी आपण ग्राईंडरचा वापर देखील करू शकता. ही पेस्ट ब्लॅक हेड्सवर लावा. तसेच ही पेस्ट आपण संपूर्ण चेहऱ्यावर मास्क प्रमाणे लावा आणि १० ते १५ मिनिटानंतर धुवून घ्या .ही पेस्ट नियमितपणे लावल्याने हे ब्लॅक हेड्स कमी होतात. चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो. आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची उघडलेली छिद्र बंद करतं.

मुरूम दूर करण्यासाठी 
१ चमचा दही आणि ४ लसणाच्या पाकळ्या घेऊन एकत्र करा. त्वचेवर लावा आणि काहीवेळ मालिश करा. काही वेळ हा पॅक तसाच ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून किमान दोनदा असं करा. या मुळे त्वचेतील मृत त्वचा निघून जाते तसेच त्वचा मऊ होते.

Web Title: Want to look younger again? Use 'this' and get rid of wrinkled skin ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.