केसगळतीच्या कारणांपैकी 'हे' आहे एक मुख्य कारण, कशी घ्याल काळजी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:27 AM2019-09-17T11:27:02+5:302019-09-17T11:32:55+5:30
केसांना मुळातून हेल्दी आणि मजबूत करायचे असतील तर तुम्हाला केसांचीच नाही तर डोक्याच्या त्वचेचीही पुरेशी काळजी घ्यावी लागेल.
(Image Credit : bebeautiful.in)
केसांना मुळातून हेल्दी आणि मजबूत करायचे असतील तर तुम्हाला केसांचीच नाही तर डोक्याच्या त्वचेचीही पुरेशी काळजी घ्यावी लागेल. डोक्याच्या त्वचेची पुरेशी काळजी घेतली नाही तर यात फंगल इन्फेक्शन, स्कीन इंन्फेक्शन होऊ लागतं. याने केस मुळातून कमजोर होतात. डोक्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी क्लीनिंग, मसाज आणि डाएट मुख्य भूमिका निभावते. डोक्याच्या त्वचेवर लक्ष दिलं नाही तर त्वचेवर डेड स्कीन तयार होऊ लागते. तसेच बॅक्टेरिया आणि केमिकल्समुळे केसगळती होऊ लागते. चला जाणून घेऊ डोक्याच्या त्वचेची काळजी कशी घ्याल.
काय कराल उपाय?
- डोक्याची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर प्रोटीन, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचा डाएटमध्ये समावेश करावा. लो फॅट डेअरी प्रॉडक्ट, कडधान्य, फळं आणि हिरव्या भाज्यांचा संतुलित आहार घेतल्यास डोक्याची त्वचा निरोगी राहते आणि केस चमकदार होतात.
- केसांना दररोज शॅम्पू करू नका. त्याऐवजी पाण्याने केस धुवावे. याने केसांवर धुळ जमा होणार नाही आणि डॅंड्रफपासूनही सुटका मिळेल. स्वीमिंग पूलमधून बाहेर आल्यावर केस शॅम्पूने धुवावे.
त्वचा ऑयली असेल तर...
- जर डोक्याची त्वचा ऑयली असेल तर चिकट केसांमध्ये तेल लावू नका. दुसऱ्यांचा कंगवा वापरू नका. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तेलाने मालिश करा. याने डोक्याची त्वचा निरोगी राहते. डोक्याच्या त्वचेची मालिश केल्याने रक्तप्रवाह व्यवस्थित होतो, तसेच मांसपेशींना आरामही मिळतो.
(Image Credit : huffingtonpost.in)
- चांगल्या क्वॉलिटीचा अॅंटी-डॅंड्रफ आणि कंडीशनरचा वापर करावा. केसांवर केमिकल ट्रिटमेंट केल्याने डोक्याच्या त्वचेवर नकारात्मक प्रभाव पडतो. अशात डोक्याच्या त्वचेवर अॅलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन-ई ऑइल कॅप्सूल लावल्याने त्वचा चांगली राहते.
- डोक्याची त्वचा खराब झाली तर केस जास्त गळतात आणि कमी वेगाने वाढू लागतात. तसेच डॅंड्रफ आणि डोक्याची त्वचा कोरडी होऊन खिपल्याही निघू लागतात. हेल्दी डाएट, मेडिटेशनने ही समस्या दूर केली जाऊ शकते.
ऑलिव ऑइल गरजेचं
- ऑलिव ऑइल केसांसाठी आणि डोक्याच्या त्वचेसाठी फायदेशीर असतं. याने केसांना चमक मिळते. डोक्याच्या त्वचेवर जमा झालेल्या खिपल्या दूर होतात. त्यासाठी दोन चमचे ऑलिव ऑइलने डोक्याच्या त्वचेची मालिश करा.
(टिप : वरील उपाय हे घरगुती उपाय आहेत. प्रत्येकाची शरीर रचना वेगवेगळी असते. त्यामुळे हे उपाय प्रत्येकाला सूट होतील असे नाही. अशात वरील कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)