तरूण दिसायचंय?; चिंचेचा फेसमास्क ट्राय करा, मग पाहा कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 01:29 PM2019-06-11T13:29:44+5:302019-06-11T13:29:59+5:30
चिंच म्हटलं की, लगेच जिभेवर आंबट-गोड चव रेंगाळते. चवीला चटपटीत असणारी चिंच पदार्थाची चव वाढविण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.
चिंच म्हटलं की, लगेच जिभेवर आंबट-गोड चव रेंगाळते. चवीला चटपटीत असणारी चिंच पदार्थाची चव वाढविण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. काही लोक चिंचेच्या आंबट चवीमुळे चिंच खाणं टाळतात. पण तुम्ही एकाद्या पदार्थामध्ये एकत्र करून याचे फायदे घेऊ शकता. काही लोकांना चिंच खायला इतकं आवडतं की, ते कधी कधी चिंच कच्चीच खातात. काही लोकांना चिंचेच्या गोळ्या आवडतात, तर काही लोकांना चिंचेची चटणी आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का? चिंच आरोग्यासोबत सौंदर्य वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरते.
चिंचेचे सौंदर्यासाठीचे फायदे :
- चिंचेमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंटव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी आणि ए असतं. जे स्किनला फ्री-रॅडिकल्सपासून वाचवण्याचं काम करतात.
- चिंच स्किनसाठी परफेक्ट ब्लीचचं काम करते आणि स्किन टोन इव्हन ठेवण्यासाठी मदत करते.
- चिंचेमध्ये अल्फा हाइड्रोक्सिल अॅसिड्स असतात. जे स्किनवरील धूळ, माती, प्रदूषण दूर करतं.
- चिंचेमधील गुणधर्म प्रत्येक प्रकारचे डाग आणि सुरकुत्या हटवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्वचेचं तारूण्य जपण्यासाठी मदत होते.
चिंचेचा फेस मास्कही फायदेशीर :
चिंचेमध्ये असणाऱ्या गुणधर्मांचा आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही फायदा होतो. त्यासाठी दही, चंदन किंवा मुलतनी मातीसोबत एकत्र करून लावू शकता. जर तुम्हाला त्वचेचं तारूण्य टिकवयचं असेल तर तुम्ही चिंच रवा किंवा मुलतानी मातीसोबत एकत्र करून लावू शकता.
असा तयार करा फेस मास्क :
चिंचेचा गर काढून त्यामध्ये मुलतानी माती एकत्र करा. त्यानंतर त्यामध्ये थोडं दूध आणि गुलाब पाणी एकत्र करून व्यवस्थित एकत्र करा. आता तयार फेस पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा. परंतु लक्षात ठेवा हा पॅक डोळ्यांवर लावू नका. अर्धा तासासाठी असचं ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवून घ्या. ही प्रोसेस आठवड्यातून दोन वेळा करा.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.