चेहऱ्यावरील केस दूर करण्यासाठी फेशिअल वॅक्स करताना काय घ्यावी काळजी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 11:21 AM2019-11-05T11:21:17+5:302019-11-05T11:24:34+5:30
चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करायचे वेगवेगळे उपाय तुम्हाला माहीत असतील. प्रामुख्याने यासाठी वॅक्सिंग आणि लेजरचा वापर केला जातो.
(Image Credit : hindi.boldsky.com)
चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करायचे वेगवेगळे उपाय तुम्हाला माहीत असतील. प्रामुख्याने यासाठी वॅक्सिंग आणि लेजरचा वापर केला जातो. लेजरमध्ये वॅक्सिंगपेक्षा अधिक पैसा लागतो आणि लोक साइडइफेक्ट्सच्या भितीने असं काही करण्यास घाबरतात देखील. त्यामुळे जास्तीत जास्त लोक वॅक्सिंग हा पर्याय निवडतात. पण फेशिअल वॅक्सिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे.
स्किन इन्फेक्शन असेल तर टाळा
(Image Credit : hindi.boldsky.com)
फेशिअल वॅक्सिंग प्रत्येकासाठी चांगला पर्याय नसतो. तुम्हाला जर स्किन इन्फेक्शन असेल किंवा पुरळ आली असेल तर चेहऱ्यावर वॅक्स करू नका. जर तुमच्या चेहऱ्यावर जास्त केस असतील आणि हे जेनेटिक असतील किंवा एखाद्या हार्मोनल असंतुलनामुळे असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने लेजरचा पर्याय निवडावा. जर तुमच्या हनुवटीवर किंवा गालांवर दाढीसारखे केस येत असतील तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.
फेशिअल वॅक्सआधी घ्या काळजी
(Image Credit : hindi.boldsky.com)
चेहऱ्यावर वापरलं जाणारं वॅक्स, दुसऱ्या वॅक्सपेक्षा वेगळं असतं. हे फार मुलायम असतं, जेणेकरून स्किनवर रॅशेज येऊ नये आणि जळजळ होऊ नये. चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर करण्यासाठी ज्या वॅक्सचा वापर करत असाल त्यात अॅलोव्हेरा, मध असतं. जेणेकरून कमीत कमी नुकसान व्हावं. तसेच असं असावं जे जास्त दिवस चावालं.
वॅक्स करण्याची पद्धत
(Image Credit : hindi.boldsky.com)
अनेकजण घरीच वॅक्स करतात, पण चेहऱ्यावर वॅक्स करणं इतकं सोपं नसतं. चेहऱ्यावर वॅक्स करण्याआधी हे तपासून बघा की, तुम्हाला योग्यप्रकारे वॅक्स करता येतं का? येत नसेल तर स्किनचं नुकसान होऊ शकतं. वॅक्सचं टेम्प्रेचर, स्ट्रिप सगळं काही योग्य असावं.
हेही ठेवा लक्षात
फेशिअल वॅक्स केल्यानंतरही त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. वॅक्स केल्यानंतर कोणतंही चांगलं मॉइश्चरायजर लावा. त्यासोबतच साबणाऐवजी चेहरा धुण्यासाठी फेस वॉशचा वापर करावा.