अंगावरील अनावश्यक केस काढण्यासाठी योग्य पद्धत कोणती? लक्षात घ्या ४ प्रमुख गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 07:26 PM2022-09-07T19:26:24+5:302022-09-07T19:30:01+5:30
तुमच्या त्वचेसाठी काय योग्य आहे हे जर तुम्हाला समजलं तर वॅक्सिंग करण्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही. शेव्हिंगपेक्षा वॅक्सिंग श्रेयस्कर असण्यामागं चार प्रमुख आणि वेगवेगळी कारणं आहेत.
बहुतांश लोक केसांच्या जास्त वाढीमुळे काळजीत असतात. अशावेळी वॅक्सिंग करावं की शेव्हिंग असा प्रश्न त्यांना पडतो. तसंच याबाबतचा निर्णय घेणंही त्यांना बऱ्याचदा कठीण आणि आव्हानात्मक वाटतं. या छोट्या निर्णयाचा परिणाम तुम्ही जीवन कशा पद्धतीनं जगता यावर होऊ शकतो. शेव्हिंग करणं हे सुरुवातीला अस्वस्थ करणारं वाटत तर त्या तुलनेत वॅक्सिंगला खरोखरच कमी वेळ लागतो. तुमच्या त्वचेसाठी काय योग्य आहे हे जर तुम्हाला समजलं तर वॅक्सिंग करण्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही. शेव्हिंगपेक्षा वॅक्सिंग श्रेयस्कर असण्यामागं चार प्रमुख आणि वेगवेगळी कारणं आहेत.
सहज आणि कायमस्वरूपी परिणाम
शेव्हिंग केल्याने काही दिवसांत तुमची त्वचा काटेरी जाणवते. त्याउलट वॅक्सिंग केल्याने तुम्हाला जवळपास तीन आठवडे तुमच्या त्वचेचा स्पर्श अगदी बाळाच्या तळहातासारखा मऊ आणि गुळगुळीत वाटतो. आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे दर काही दिवसांनी शेव्हिंग करण्यासाठी वेळ काढणं कदाचित आव्हानात्मक ठरू शकतं. वॅक्सिंग केल्यानंतर तुमची त्वचा अनेक आठवडे मुलायम राहते. कारण या क्रियेत केस मुळापासून पुन्हा वाढण्यास मदत होते.
चट्टे आणि खाज सुटण्याची समस्या निर्माण होत नाही
शेव्हिंग केल्यानंतर कापल्यामुळे जखम होऊ शकते. तुम्हीच एकच रेझर वारंवार वापरत असाल आणि तुमच्या त्वचेला कापलं तर संसर्ग होण्याचा धोका असतो. रेझरमुळे कापल्याने वेदना होऊ शकतात. वॅक्सिंगमुळे असा कोणताही त्रास न होता डिपिलेशन अर्थात केस काढून टाकणं शक्य आहे. वॅक्सिंगमुळे चांगले परिणाम दिसून येतात. शेव्हिंगमुळे रेझर बर्न, जळजळ, केसांची वाढ लवकर होणं, केसांच्या ग्रंथींना सूज येणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. या उलट वॅक्सिंगमुळे त्वचेवरचा थर सहज निघून जातो.
एक्सफोलिएशनची खात्री
त्वचेच्या मृत पेशींचा थर सहजपणे निघून जाणं हा वॅक्सिंगचा अजून एक फायदा आहे. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्यामुळे तुमची त्वचा मऊ होते. गरजेनुसार तुम्ही वॅक्सिंगच्या काही दिवसआधी एक्सफोलिएट करू शकता. केसांची लवकर वाढ टाळण्यासाठी तुम्ही वॅक्सिंगच्या काही दिवस आधी तुमची त्वचा एक्सफोलिएट करा. शेव्हिंग केल्यानंतर त्वचा गडद दिसत असल्याचं निरीक्षण काही जण नोंदवतात. तथापि वॅक्सिंग केल्यानंतर असं होत नाही. त्वचेवरील मृत पेशींचा थर काढून टाकण्यासोबतच वॅक्सिंगमुळे हायपरपिग्मेंटेशन टाळण्यास ही मदत होते.
पुन्हा वाढणारे केस असतात पातळ
जर तुम्ही नियमित वॅक्सिंगचं शेड्यूल पाळलं तर तुमच्या केसांची वाढ कमी वेगानं होऊ शकते. तुम्ही वॅक्सिंग नियमित केलं तर केस परत वाढल्याचं तुमच्या फारसं लक्षातही येणार नाही. वारंवार वॅक्सिंग केल्यामुळे तुमच्या केशग्रंथी कमकुवत आणि बारीक दिसू लागल्याचं दिसून येईल. शेव्हिंगमुळे या ग्रंथीच्या जाड भागावरील केस तुटतात. त्यामुळे ते पुन्हा दाट होतात.