वॅक्सिंग करावं की शेविंग? जाणून घ्या वॅक्सिंगसाठी नक्की कोणता पर्याय वापराल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 01:15 PM2018-09-19T13:15:45+5:302018-09-19T13:17:02+5:30
शरीरावरील नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी वॅक्सिंग करण्यात येते. त्यासाठी हॉट वॅक्स किंवा रेजरचा वापर केला जातो. पण याबाबत अनेक महिलांना पडलेला एक कॉमन प्रश्न म्हणजे, शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी कोणता पर्याय स्विकारावा?
शरीरावरील नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी वॅक्सिंग करण्यात येते. त्यासाठी हॉट वॅक्स किंवा रेजरचा वापर केला जातो. पण याबाबत अनेक महिलांना पडलेला एक कॉमन प्रश्न म्हणजे, शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी कोणता पर्याय स्विकारावा? रेजरचा की, हॉट वॅक्सिंगचा? अनेक महिला याबाबत कन्फ्यूज असतात. तसं पाहायला गेलं तर अनेक महिला हॉट वॅक्सचा मार्ग स्विकारतात. पण यापैकी कोणताही मार्ग स्विकारण्याआधी तुम्हाला तुमचा स्कीन टाइप, हेअर टेक्सचर आणि हेअर ग्रोथ याबाबत माहीत असणं गरजेचं असतं. त्यासाठी या दोन्ही पर्यांयांचे फायदे आणि नुकसान जाणून घेऊयात...
रेजरने केस काढले तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत. तुम्ही घरच्या घरीही अगदी सहज केस काढू शकता. बाजारात इलेक्ट्रॉनिक्स शेवर्स आणि एपिलेटर्स आल्यानंतर साध्या रेजरवर अवलंबून रहण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे पार्लरमध्ये जाण्याचा वेळ नसेल तर तुमच्यासाठी शेविंग हा बेस्ट ऑप्शन असेल. जर तुमची स्कीन खूप जास्त सेंसिटीव्ह असेल तर, हॉट वॅक्सिंगळे स्कीनला हानी पोहचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा स्कीन टाइपसाठी शेविंग करणं हा बेस्ट ऑप्शन असतो.
वॅक्सिंगसाठी रेजरचा वापर केल्याने होणारं नुकसान
शेविंग केल्यामुळे स्कीन ड्राय होते आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे शेविंग केल्यामुळे केसांची वाढ होण्याची शक्यता असून त्यामुळे डार्क स्पॉट्सही येतात.
शेविंग करण्यासाठी काही टिप्स -
- शेविंगसाठी जर रेजरचा वापर करत असाल तर त्यानंतर स्कीनला मॉयश्चरायझर लावायला विसरू नका.
- डिस्पोजेबल रेजरचा वापर करा. जर रेजर पुन्हा वापरणार असाल तर एक रेजर 2 पेक्षा जास्त वेळा वापरू नका.
हॉट वॅक्सचे फायदे -
हॉट वॅक्सने वॅक्सिंग केल्याने होणारा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, यामध्ये केस मुळांपासून निघून येतात. त्यामुळे अनेक आठवड्यांपर्यंत स्कीन हेअर फ्री राहते. त्याचबरोबर वॅक्सिंग केल्यानंतर स्कीन सॉफ्ट होण्यासही मदत होते. त्यामुळे शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग करणं ही एक नैसर्गीक पद्धत आहे.
वॅक्सिंग केल्याने होणारे नुकसान
वॅक्सिंग करण्याचं सर्वात मोठं नुकसान म्हणजे यामध्ये फार वेदनांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर जेव्हा सारखं सारखं वॅक्सिंग करण्यात येतं त्यावेळी त्वचेची इलास्टिसिटी म्हणजेच लवचिकपणा कमी होतो. जर वॅक्स खूप जास्त गरम असेल तर स्कीनला रॅशेस होण्याचीही शक्यता असते. जर तुमची हेअर ग्रोथ जास्त असेल तर तुमच्यासाठी वॅक्स हा उत्तम पर्याय आहे.
वक्सिंग करताना काही टिप्स -
- वॅक्सिंग करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही ज्या सलूनमध्ये जाताय त्याठिकाणी डिस्पॉजेबल वॅक्सिंग स्ट्रिपच वापरल्या जातात ना? याची खात्री करून घ्या.
- वॅक्सिंग केल्यानंतर स्कीनवर कूलिंग पॅड किंवा बर्फाच्या सहाय्याने शेक द्या. यामुळे स्कीनला थंडावा मिळण्यास मदत होईल.