हिवाळ्यात स्किनवर उद्भवतेय रेडनेसची समस्या?; अशी घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 04:23 PM2018-12-31T16:23:32+5:302018-12-31T16:33:43+5:30

उन्हाळ्यापेक्षा थंडीमध्ये त्वचेची जास्त काळजी घेण आवश्यक असतं. कारण वातावरणातील गारव्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे अशा थंड वातावरणात त्वचा लाल आणि शुष्क होते.

Ways to fight winter skin redness | हिवाळ्यात स्किनवर उद्भवतेय रेडनेसची समस्या?; अशी घ्या काळजी!

हिवाळ्यात स्किनवर उद्भवतेय रेडनेसची समस्या?; अशी घ्या काळजी!

Next

उन्हाळ्यापेक्षा थंडीमध्ये त्वचेची जास्त काळजी घेण आवश्यक असतं. कारण वातावरणातील गारव्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे अशा थंड वातावरणात त्वचा लाल आणि शुष्क होते. त्वचा पूर्णपणे हायड्रेट नसल्यामुळे त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक समस्या म्हणजे त्वचेवर येणारे लालसर चट्टे. जर तुम्ही यावर योग्यवेळी उपचार केले नाही तर ही साधारण समस्या गंभीर रूप घेऊ शकते. ही समस्या उद्भवण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. त्यामध्ये अॅन्टीबॅक्टेरियल साबण, डिटर्जेंट किंवा केमिकलयुक्त साहणाचा वापर केल्यामुळेही समस्या उद्भवू शकते. 

त्वचेला इन्फेक्शन होणं

थंडीमध्ये त्वचेवर येणारे लाल चट्टे कमी करण्यासाठी लोशन आणि क्रिमचा वापर करून स्किन ड्राय होण्यापासून बचाव करू शकता. जाणून घेऊया त्वचेची काळजी घेण्याच्या पद्धती... 

मॉयश्चरायझर 

त्वचा हायड्रेट ठेवण्याची ही फार सोपी पद्धत आहे. त्वचेवर लाल चट्टे आल्यामुळे त्या ठिकाणी डाग पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या स्किन टाइपनुसार मॉयश्चरायझरचा वापर करू शकता. दिवसातून दोन वेळा त्वचेसाठी मॉयश्चरायझरचा वापर केल्याने त्वचा कोरडी पडणार नाही. 

योग्य साबणाचा करा वापर

थंडीमध्ये साबणाचा वापर करताना विशेष काळजी घ्या. या वातावरणामध्ये त्वचा फार कोरडी पडते. त्यामुळे मॉयश्चराइझ साबणाचाच वापर करा. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल आणि त्वचेच्या सर्व समस्यांपासून सुटकाही होईल. 

योग्य पद्धतीने काळजी घ्या 

थंड वातावरणामध्ये त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घेणं गरजेचं असतं. जास्त एक्सपेरिमेंट केल्यामुळे स्किन डॅमेज होण्याचा आणि त्वचेला खाज येण्याचा धोका वाढतो. दररोज त्वचेची व्यवस्थित स्वच्छ करा. तसेच टॉवेलऐवजी मुलायम कपड्याचा वापर करा. 

सनस्क्रिनचा वापर करा

थंडी असो किंवा उन्हाळा कोणत्याही वातावरणामध्ये सनस्क्रिनचा वापर करणं गरजेचं असतं. सनस्क्रिन लावल्यामुळे त्वचेचं यूवी किरणांपासून रक्षण होतं. घरातून बाहेर निघण्याआधी सनस्क्रिनचा अवश्य वापर करा. त्यामुळे त्वचेसंबंधिच्या समस्यांपासून बचाव होतो. 

आपल्या डाएटची काळजी घ्या

त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आहारामध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करणं आवश्यक असतं. या वातावरणामध्ये रोगप्रतिकारक शक्ती फार कमी असते. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आहारा संतुलित असणं आवश्यक असतं. थंडीमध्ये आहारात गाजर, संत्री, बीट इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश केल्याने त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. 

Web Title: Ways to fight winter skin redness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.