वेस्टर्न नृत्याकडे वाढता कल ...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2016 03:13 PM2016-07-05T15:13:50+5:302016-07-05T20:43:50+5:30
वेस्टर्न नृत्याकडे लहानापासून मोठ्यांचा कल आहे
Next
नृत्य हे तसे कोणतेही असो, त्यामुळे शरीराचा एक उत्तम व्यायाम त्यामुळे होतो. संगीत व कला यामुळे मन हे नेहमी उत्साहीत राहते. शास्त्रीय नृत्य हा मूळ भारतीय प्रकार आहे. अनेक दिग्गज या क्षेत्रात होऊन गेले आहेत. अगदी प्राचीन काळापासून हा प्रकार आपल्याकडे चालत आला आहे. परंतु, वेस्टर्नमधील विविध प्रकार शिकण्याकडे दिवसेंदिवस ओढा हा वाढत आहे. कारण की, वेगवेगळे इव्हेंटस व शोजची वाढती संख्या त्याचबरोबर टी.व्ही., थिएटर, सिनेमा, म्युझिक व्हिडीओ यामुळे कोरिओग्राफर्सने चांगली संधी आहे. तसेच सहा महिन्यात वेस्टर्नमधील कोणताही नृत्यप्रकार आपल्याला शिकता येतो. तसेच कोरिओग्राफर्स म्हणून करिअर करण्यासाठी वेस्टर्न हा नृत्यप्रकार शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे वेस्टर्नकडे हा ओढा वाढतच आहे. वेस्टर्नमध्ये नृत्याचे विविध प्रकार आहेत.
हिफॅहाफ : या प्रकारात विविध प्रकारचे चढउतार असून, रिदम महत्वाचा आहे.
पॉप : या नृत्यात माईकल जॅक्सनच्या स्टेप जास्त यूज केल्या जातात.
झुम्बा : सर्व प्रकारच्या वेस्टर्न नृत्याचे यामध्ये मिश्रण आहे. विविध प्रकारच्या शारीरिक व्याधीवरही हा नृत्यप्रकार उपयुक्त आहे.
डुएट : हा नृत्य प्रकार आपल्या जोडीदारासोबत केला जातो.
बॉल : यामध्ये विविध प्रकारचे प्रॉप्स घेऊन हे नृत्य शिकविले जाते. पार्टी डान्स म्हणून या प्रकाराला ओळखले जाते.
अॅरोबिक्स : कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला हा नृत्यप्रकार करता येतो. अलीकडे शारीरिक व्यायामासाठी हा एक उत्तम प्रकार म्हणून पुढे आला आहे.
रोबोट डान्स : यांत्रीक मानव जसा हालचाली करतो. त्यावर आधारित हा नृत्यप्रकार आहे.
आज जरी कोरिओग्राफ र्संच्या विविध संधी निर्माण झाल्याने मोठा पैसा मिळत आहे. परंतु, शास्त्रीय नृत्य हे सर्व प्रकारच्या नृत्याचे बेसीक आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्य शिकणे सुद्धा आजघडीला गरजेचे आहे.
बॉलीवूड स्टार
बॉलीवूड चित्रपटातही वेस्टर्न नृत्यच केले जाते. यामध्ये शाहिद कपूर नेहमी वेस्टर्न नृत्यच करतो. त्याच्या गुरुचा तो सर्वात आवडता शिष्य आहे. कैतरिना कैफ सुद्धा धूम -३ या चित्रपटात कमली कमली या गाण्यावर वेस्टर्नमध्येच थिरकली आहे. यासह अन्य बॉलीवूड स्टारची सुद्धा वेस्टर्न नृत्यालाच पसंती आहे.