मिठाच्या पाण्याचे त्वचेसाठी होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्, महागड्या प्रॉडक्ट्सना कराल बाय-बाय! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 09:11 AM2019-09-05T09:11:55+5:302019-09-05T09:20:40+5:30

त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकजण महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. पण महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी मिठानेही तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.

What are the beauty benefits of salt water | मिठाच्या पाण्याचे त्वचेसाठी होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्, महागड्या प्रॉडक्ट्सना कराल बाय-बाय! 

मिठाच्या पाण्याचे त्वचेसाठी होणारे फायदे वाचून व्हाल अवाक्, महागड्या प्रॉडक्ट्सना कराल बाय-बाय! 

Next

(Image Credit : Social Media)

मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. पण या नैसर्गिक मिनरलचे आरोग्यासाठी अनेक फायदेही होतात. ब्लड शुगर नियंत्रित करणे, वजन कमी करणे इत्यादीसाठी मीठ फायदेशीर आहे. इतकेच नाही तर मीठ आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असतं. मिठाच्या पाण्यात मिनरल्स जसे की, कॅल्शिअम, सिलिकॉन, सोडिअम इत्यादी आढळतात. त्यामुळे त्वचेसाठी आणि केसांसाठी महागड्या उत्पादनांचा वापर करणं गरजेचं नाही. चला जाणून घेऊ मिठाच्या पाण्याचा वापर... 

पिंपल्सने हैराण असाल तर...

(Image Credit : herzindagi.com)

मिठाच्या पाण्यात असलेली हीलिंग प्रॉपर्टीज त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. जर तुम्ही सतत येणाऱ्या पिंपल्सने हैराण असाल तर एक कप पाण्यात एक चमचा मीठ मिश्रित करा. हे पाणी रूईच्या मदतीने प्रभावित भागांवर लावा आणि कोरडं होऊ द्या. नंतर चेहरा पाण्याने धुवावा. 

त्वचा एक्सफोलिएट करतं

(Image Credit : boldsky.com)

त्वचेवरून मृत पेशी दूर करण्यासाठी एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं. मिठाच्या रफ टेक्चरमुळे त्वचा चांगल्याप्रकारे एक्सफोलिएट करण्यास मदत मिळते. मीठ आणि त्यात थोडं पाणी टाकून घट्ट पेस्ट तयार करा. मिठाचं प्रमाण अधिक ठेवा. या पेस्टने त्वचेवर हळूहळू मसाज करा. 

त्वचेची सुरक्षा

(Image Credit : drjohnfagbemi.co.uk)

मिठात अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, जे त्वचा कापली गेल्यावर ठीक करण्यास याने मदत होते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरावरील सर्व बॅक्टेरिया मारण्यास मदत मिळते. सोबतच त्वचेवरील सगळे घावही भरले जातात.

तजेलदार त्वचेसाठी मिठाच्या पाण्याचं सेवन

(Image Credit : beautyglimpse.com)

तजेलदार आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी केवळ बाहेरील पोषण नाही तर आतूनही पोषण गरजेचं असतं. त्यासाठी रोज कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिश्रित करून सेवन करा. याने शरीराला डिटॉक्सीफाय होण्यास मदत मिळते आणि सूजही कमी होते. सोबतच त्वचा तजेलदार होते.

पाय स्वच्छ करण्यासाठी

(Image Credit : healthyliving.azcentral.com)

मिठाच्या पाण्याने पाय स्वच्छ केले तर याने थकवा दूर होतो. पायांवरून मृत पेशींना दूर करण्यासाठी मिठाचं पाणी फायदेशीर ठरतं. कोमट पाण्यात मीठ टाका आणि त्यात थोडा वेळ पाय ठेवा. नंतर स्क्रब करा. याने पाय चांगले स्वच्छही होतील आणि थकवाही दूर होईल.

(टिप : वरील लेखातील सल्ले आणि उपाय हे माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण काही लोकांना हे उपाय सगळ्यांना सूट करतील असं नाही. काहींना यामुळे समस्याही होऊ शकतात. कारण प्रत्येकाची त्वचा वेगवेग्या प्रकारची असते.)

Web Title: What are the beauty benefits of salt water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.