केस गळती होण्याची काय आहेत कारणे?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 05:00 PM2018-05-29T17:00:26+5:302018-05-29T17:00:26+5:30
केस गळणे ही समस्या अनेकांना सतावत असते. एका वयानंतर केस गळणे सामान्य बाब आहे. पण कमी वयातच तुमचे केस गळत असतील तर तुम्हाला नक्कीच केसांशी संबंधीत काहीतरी समस्या आहे असे समजा.
केस गळणे ही समस्या अनेकांना सतावत असते. एका वयानंतर केस गळणे सामान्य बाब आहे. पण कमी वयातच तुमचे केस गळत असतील तर तुम्हाला नक्कीच केसांशी संबंधीत काहीतरी समस्या आहे असे समजा. केस गळती होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये थकवा, त्वचेचा कोरडेपणा, भूक कमी लागणे, पोट खराब असणे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता असणे ही आहेत. या कारणांवरुनच केसगळण्याचे प्रकार पडतात.
केस गळती होण्याची कारणे
केस गळती होण्याची अनेक कारणे आहेत. कधी कधी तुम्ही आजारी पडल्यानंतरही केस गळतात. वेळेआधीच केस गळणे म्हणजे तुम्हाला काहीतरी समस्या आहे. असंतुलित डाएट हेही याचं एक कारण असू शकतं. किंवा एखाद्या आजाराच्या काही काळापासून सुरु असलेल्या उपचारामुळेही केस गळती होते. तसेच एखाद्या प्रकारचा मानसिक आघातामुळेही केस गळण्याची समस्या होते. रक्त संचार कमी झाल्यानेही केस गळतात. डायबेटिजने ग्रस्त असलेल्या रुग्णांनाही केस गळतीची समस्या होऊ शकते. केसांची योग्य काळजी न घेणे, स्वच्छता न ठेवणे, केसात कोंडा होणे यामुळेही केस गळतात.
केस गळतीचे प्रकार
केस गळतीचा एका प्रकाराला मेल पॅटर्न बाल्टनेस असं म्हणतात. यात केस गळतीनंतर पुन्हा पातळ केस येतात. ते जवळपास अदृश्यच असतात. हे केस दिसत नसल्याने व्यक्तीचं टक्कल दिसायला लागतं. केसगळतीच्या रुग्णांमधील 90 टक्के रुग्ण या श्रेणीत येतात.
काय करावे उपाय ?
खोबऱ्याचं तेल बदामच्या तेलात मिश्रित करुन हळुवार मालिश करा. ही मालिश तुम्ही 15 मिनिटांपर्यंत करु शकता. त्यानंतर कोमट पाण्याने टॉवेल भिजवून केसांवर गुंडाळा. ते तसेच 2-3 मिनिटे ठेवा. असे काही दिवस सतत केल्यास केसांचे मुळ मजबूत होतात. सोबतच केस गळतीही कमी होते.
(टिप- या उपायाने तुम्हाला केस येतीलच असा दावा आम्ही करत नाही. काही लोकांना हा उपाय लागू पडेल तर काहींना नाही. त्यामुळे योग्य उपचारासाठी डॉक्टरांचाही सल्ला घेणे आवश्यक आहे)