केसगळती रोखण्यासाठी पुरूषांनी 'या' गोष्टींची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 12:15 PM2019-09-06T12:15:36+5:302019-09-06T12:24:54+5:30
उन्हामुळे, धुळीमुळे आणि प्रदूषणामुळे केसांचं फार जास्त नुकसान होतं. अशात जर केसांची योग्य काळजी घेतली गेली नाही तर केस कमजोर होऊन केस गळू लागतात.
(Image Credit : www.advanceclinic.in)
उन्हामुळे, धुळीमुळे आणि प्रदूषणामुळे केसांचं फार जास्त नुकसान होतं. अशात जर केसांची योग्य काळजी घेतली गेली नाही तर केस कमजोर होऊन केस गळू लागतात. पुरूष अलिकडे त्यांच्या ग्रुमिंगबाबत चांगलेच सजग दिसतात. वेगवेगळ्या हेअरस्टाइलसाठी तयार करण्यासाठी जेल आणि हेअर कॉस्मेटिकचा वापर करतात. पण या प्रॉडक्टमध्ये असलेल्या हानिकारक केमिकल्समुळे केस डॅमेज होतात. अशात काही टिप्स फॉलो करून पुरूष त्यांच्या केसांची काळजी घेऊ शकतात.
१) ड्राय केसांसाठी काय करावे?
(Image Credit : uniquehairconcepts.com)
केस ड्राय असण्याचं कारण डोक्याची त्वचा कोरडी किंवा रखरखीत असणे हे आहे. यामुळे केसांमध्ये डॅड्रफ होतात. अशात केसांची तेलाने मालिश करणे गरजेचं आहे.
काय करू नये?
गरम पाण्याने केस धुतल्याने केसांचा रखरखीतपणा आणखी वाढतो. यामुळे गरम पाण्याने केस न धुणे हेच केसांसाठी फायदेशीर ठरतं.
२) तेलकट केसांसाठी काय करावे?
(Image Credit : jonssonprotein.com.sg)
जर तुम्हाला वाटत असेल की, केस कमी चिकट आणि तेलकट दिसावे तर यासाठी ऑइल फ्री शॅम्पूचा वापर करावा. सोबतच केस धुतल्यानंतर कंडीशनर लावा.
काय करू नये?
ऑयली डोक्याच्या त्वचेवर तेल लावू नका. याने केस आणखी जास्त तेलकट दिसू शकतात.
३) पातळ केसांसाठी
(Image Credit : mysimpleremedies.com)
वाढत्या वयासोबत केसही कमजोर होऊ लागतात. ज्यामुळे केसगळतीची समस्या होऊ लागते. केसगळती आणि केस पातळ झाले असेल तर डाएटमध्ये बदल करा आणि हेल्दी आहार घ्या.
काय करू नये?
केस फार जास्त वाढू देऊ नये. लहान केस ठेवा. कारण लांब केस कमजोर होता आणि वेगाने केसगळती होते.
४) केस धुतांना काय काळजी घ्यावी?
(Image Credit : youtube.com)
केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा आणि आठवड्यातून कमीत कमी २ ते ४ वेळा तेलाने मालिश करा. केस धुतल्यानंतर कंडीशनर जरूर लावा.
काय करू नये?
चांगलं वाटत असलं तरी केस धुण्यासाठी फार गरम पाण्याचा वापर करू नये. याने केस अधिक कमजोर होतात. सोबतच केस कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका. याने केसांवर दबाव पडतो आणि केस तुटतात.
(टिप : वरील लेखातील सल्ले आणि उपाय हे केवळ माहिती म्हणून दिले आहेत. केसगळतीची वेगवेगळी कारणे असू शकतात, त्यामुळे तज्ज्ञाांचा सल्ला घेतल्याशिवाय वरील उपाय फॉलो करू नका.)