सन टॅनिंग आणि सन बर्नमध्ये फरक काय?; जाणून घेणं गरजेचं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:31 PM2019-05-03T14:31:00+5:302019-05-03T14:34:36+5:30

सध्या उन्हाळा सुरू असून आपण सर्वचजण त्वचेचं उन्हापासून रक्षण करण्यासाठी अनेक उपाय करत आहोत. खरं तर त्वचा अत्यंत संवेदनशील असते. अशातच उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर किरणांचा प्रभाव त्वचेवर होतो.

What is the difference between sun tanning and sun burn tips to skin care in summer | सन टॅनिंग आणि सन बर्नमध्ये फरक काय?; जाणून घेणं गरजेचं

सन टॅनिंग आणि सन बर्नमध्ये फरक काय?; जाणून घेणं गरजेचं

googlenewsNext

सध्या उन्हाळा सुरू असून आपण सर्वचजण त्वचेचं उन्हापासून रक्षण करण्यासाठी अनेक उपाय करत आहोत. खरं तर त्वचा अत्यंत संवेदनशील असते. अशातच उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर किरणांचा प्रभाव त्वचेवर होतो. तसेच वातवरणातील उकाडा, प्रदूषण, गरम हवा, पाणी आणि प्रखर सूर्यकिरणांचा त्वचेवर परिणाम होतो. कारण सूर्याच्या किरणांचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. ज्यामुळे त्वचेवर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. यालाच सनबर्न म्हणतात. अनेक लोकांना सनबर्न आणि सन टॅनमधील फरक माहीत नसतो. जाणून घेऊया यामधील फरक... 

सनबर्न आणि सन टॅनिंगमध्ये असलेला फरक

सनबर्न आणि सन टॅनिंगमध्ये खूप फरक आहे.  सनबर्नमुळे त्वचा भाजली जाते. यामुळे चेहऱ्यावर जळल्याप्रमाणे डाग येतात. त्यानंतर जे डाग त्वचेवर तयार होतात. त्यांचा रंग फार गडद असतो, तसेच लाल चट्टेदेखील येतात. याला सनटॅनिंग असं म्हणतात. सूर्यापासून निघणारी अल्ट्रावायलेट किरणं यूवीए आणि यूवीबी, दोन प्रकारची असतात. ज्यामध्ये यूवीए त्वचेसाठ सर्वात जास्त घातक असतात. ही त्वचेच्या संपर्कात आल्यावर बऱ्याच दिवसांपर्यंत त्वचेवर त्यांचा परिणाम दिसून येतो. 

सनस्क्रिनचा वापर करा 

उन्हामध्ये बाहेर पडणार असाल तर 15 ते 20 मिनिटं आधी सनस्क्रिम लोशन त्वचेवर अप्लाय करा. यामुळे त्वचेचं बाहेरून आणि आतून होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो. सनस्क्रीन त्वचेच्या आतपर्यंत जाऊन एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे त्वचेचं रक्षण करतं. ज्यामुळे सूर्याच्या किरणांचा त्वचेवर परिणाम होत नाही. यामुळे त्वचेवर टॅनिंगचा परिणाम लवकर होत नाही. तसेच त्वचेचं पीएच मेन्टेन ठेवण्यास मदत होते. 

उशीरापर्यंत होतो त्वचेवर परिणाम

थोडसं दुर्लक्षं केलं तरिही त्वचेवर टॅनिंगचा प्रभाव बराच वेळ राहू शकतो आणि यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. कमी वयातच चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग यांसारख्या समस्या वाढू लागतात. अशातच टॅनिंगपासून बचाव करण्यासाठी त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. घरगुती उपाय वापरून त्वचेची काळजी घेतली जाऊ शकते. 

टॅनिंगचे साइड इपेक्ट्स 

प्रखर उन्हामध्ये उशीरापर्यंत फिरणं एक साधारण गोष्ट आहे. यामुळे त्वचेचा रंग काळआ पडतो. त्वचा कोरडी, निस्तेज होते आणि सुरकुत्याही दिसू लागतात. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी फार वेळ लागतो. 

सावळी त्वचा असणाऱ्यांनी वेळीच सावध होणं गरजचे

टॅनिंगची समस्या सावळ्या त्वचेवर लगेच दिसून येते. सूर्याच्या संपर्कात आल्याने त्वचेचा रंग काळा होतो. जर रंग सावा असेल, तर याचा परिणाम थेट चेहऱ्यावर दिसून येत नाही. डार्क कॉम्प्लेक्शन असणाऱ्यांनी त्वचेचं रक्षण करण्यासाठी एसपीएफ 15 असणारं सनस्क्रिन यूज करणं गरजेचं असतं. यामुळे त्वचेचं पराबँगनी किरणांपासून बचाव होतो. यामध्ये व्हिटॅमिन बी3 आणि अॅन्टीऑक्सिडंट असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा आणि डाग दूर करण्यासाठी मदत करतात. 

एसपीएफ 15 असणारं सनस्क्रिन वापरा 

भारतीय लोकांनी आपल्या त्वचेनुसार, 15 ते 20 एसपीएफ असणाऱ्या सनस्क्रिन क्रिमचा उपयोग करणं आवश्यक असतं. सूर्याच्या हानिकारक किरणांचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. ज्यामुळे त्वचा काळी, शुष्क आणि निस्तेज दिसते. अशातच सूर्याची पराबँगनी किरणांमुळे त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी एसपीएफ 15 ते 20 सनस्क्रिन लोशनचाच वापर करा. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: What is the difference between sun tanning and sun burn tips to skin care in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.