मुलायम आणि सुंदर त्वचेसाठी इलेक्ट्रिक फेशिअल, जाणून घ्या काय आहे हे फेशिअल?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 02:10 PM2019-01-29T14:10:21+5:302019-01-29T14:11:58+5:30
आपलं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी किंवा आणखी खुलवण्यासाठी महिला आणि पुरूष वेगवेगळ्या फेशिअलचा वापर करताना दिसतात.
(Image Credit : resultadoloterias.co)
आता दररोज ब्यूटी क्षेत्रात नवनवीन प्रकार बघायला मिळत आहेत. आपलं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी किंवा आणखी खुलवण्यासाठी महिला आणि पुरूष वेगवेगळ्या फेशिअलचा वापर करताना दिसतात. यात एक फेशिअल फारच लोकप्रिय होताना दिसत आहे. याला मायक्रोकरंट फेशिअल असं म्हणतात. हे फेशिअल सेलिब्रिटी आणि ब्यूटी ब्लॉगर्समध्ये चांगलंच लोकप्रिय असल्याचं बोललं जातं. चला जाणून घेऊ काय आहे हे फेशिअल...
मायक्रोकरंट फेशिअल काय आहे?
या फेशिअलमध्ये पेशींमध्ये सुधार करण्यासाठी एका मशीनच्या मदतीने तुमच्या त्वचेमध्ये मायक्रोकरंट एनर्जी सोडली जाते. पेशींच्या सुधारणेत वेग यावा यासाठी आणि हेल्दी पेशींची निर्मिती व्हावी यासाठी शरीरात मायक्रोकरंट अमिनो अॅसिड आणि एडेनोसिन ट्रायफॉस्फेट वाढवतो.
काय होतात फायदे?
हे फेशिअल संवेदनशील त्वचेसाठी आहे आणि याने त्वचा तरूण दिसते. तसेच याने त्वचेवर एक ग्लो येतो. मायक्रोकरंट मांसपेशी चांगल्या करण्यासाठी रक्तप्रवाह वाढवतो. याने चेहऱ्याच्या मांसपेशी अजिबात कमजोर होत नाहीत. त्यासोबतच त्वचा याने मुलायम होते. ज्यांना चेहऱ्यावर बोटॉक्स करायचं नाहीये त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
कसं केलं जातं?
1) सर्वातआधी चेहऱ्याची स्वच्छता केली जाते. चेहऱ्यातील तेलकटपणा साफ केला जातो.
२) त्यानंतर एक अॅलोवेरा जेल लावलं जातं. याने त्वचा सुरक्षित होण्यासोबतच हायड्रेटही राहते.
३) आता अल्ट्रासॉनिक स्क्रबरने जल स्वच्छ केलं जातं. नंतर हलक्या व्हायब्रेशनने त्वचेचा एक्सफॉलिएट केलं जातं.
४) नंतर तुमच्या स्कीन टोननुसार एलईडी लाइट लावली जाते. लाल लाइटने कोलाजनची निर्मिती वाढते आणि सुरकुत्या कमी होतात.
५) ५० मिनिटांच्या या ट्रिटमेंटनंतर चेहऱ्याची मसाज केली जाते आणि यासाठी एका मॉइश्चरायजरचा वापर केला जातो.
किती दिवसांनी करावं हे फेशिअल?
वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे परिणाम बघायला मिळतात. पण एक्सपर्टचं मत आहे की, ३ ते ५ फेशिअलसोबत ट्रिटमेंट सुरू केली जाऊ शकते. त्यानंतर नियमित फॉलोअप केलं जातं. साधारण फेशिअलप्रमाणे याने त्वचे सोलली जात नाही.