काय आहे त्वचेवर होणारी फॉलिक्युलिटिस समस्या? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 09:49 AM2020-01-13T09:49:57+5:302020-01-13T09:55:57+5:30
ही समस्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रभावित करते. ही समस्या होण्याला जी कारणे जबाबदार आहेत ती रोखली जाऊ शकतात.
फॉलिक्युलिटिस ही त्वचेची अशी समस्या आहे ज्यात त्वचेवरील रोमछिद्रांवर सूज येते. खासकरून दाढी, आर्म्सपीट, पाठ, कंबर आणि पायांवर हे एकप्रकारचं इन्फेक्शन होतं. यात सुरूवातील लाल रंगाची एक पुरळ किंवा पिंपल येतो. आणि हळूहळू ही समस्या शरीरावर इतरही पसरू शकते. ही समस्या जास्त गंभीर नसली तरी याने त्वचेवर खास आणि कोरडेपणा येऊ शकतो. तसेच याने अस्वस्थता होईल. याने केस गळू लागतात आणि खराब होतात.
फॉलिक्युलिटिस ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रभावित करते. ही समस्या होण्याला जी कारणे जबाबदार आहेत ती रोखली जाऊ शकतात. पण त्यासाठी वेळेवर डॉक्टरांना संपर्क करावा लागेल.
काय आहेत लक्षणे?
- लाल पुरळ किंवा पिंपल्स...यांच्या मधे एक केस असतो.
- जर पुरळ फुटली तर त्यातून रक्त किंवा पस बाहेर येतो.
- त्वचा संक्रमित होते.
- त्वचेवर जळजळ, सूज आणि खाज येऊ शकते.
- त्वचा अधिक कोमल होऊन वेदना होऊ लागतात.
वेळीच घ्या उपचार
ही समस्या फार गंभीर नसेल तर काहीही उपचार न करता दोन आठवड्यात आपोआप बरोबर होईल. यावेळी तुम्ही त्वचा गरम कापडाने शेकू शकता. पण जर त्वचेवर लाल चट्टा, पुरळ, सूज वेदना होत असेल किंवा पिंपल्स दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ राहत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रत्येकाची शरीर रचना वेगवेगळी असते, त्यामुळे जास्त उशीर न करता वेळीच उपचार घ्यावे.
कोणत्या कारणाने होते ही समस्या?
त्वचेवर ही समस्या होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. जसे की, डर्मेटायटिस आणि पिंपल्स, त्वचेवर व्हायरस असल्याने किंवा केस तुटल्याने ही समस्या होऊ शकते. त्वचेवर काही जखम झाली असेल तरी सुद्धा ही समस्या हाऊ शकते. त्यासोबतच त्वचेवर कपड्याचं घर्षण होणे किंवा शेव्हिंगमुळेही होऊ शकते. तसेच ही समस्या होण्याला काही बॅक्टेरियाही कारणीभूत असतात. हे बॅक्टेरिया शरीरावर नेहमीच असतात आणि त्यांना स्टेफिलोकोकस असं म्हणतात.
काय करावे उपचार?
- आपल्या लाइफस्टाईलमध्ये बदल करूनही तुम्ही या समस्येपासून बचाव करू शकता. सोबतच काही घरगुती उपायही तुम्ही करू शकता. जसे की, टॉवेल दुसऱ्यासोबत शेअर करू नका, शरीर स्वच्छ ठेवा, नखाने त्वचेवर खाजवू नका.
- जास्त पिणे आरोग्यासाठी सगळ्याच दृष्टीने फायद्याचं असतं. नियमित आणि योग्य प्रमाणात पाण्याचं सेवन केल्याने त्वचा निरोगी राहते आणि फॉलिक्युलिटिसची समस्याही रोखली जाऊ शकते.
(Image Credit : wikihow.com)
- ज्या ठिकाणावर पुरळ आली आहे त्यावर सतत हात लावू नका किंवा पुरळ फोडण्याचा प्रयत्न करू नका. स्वच्छ कापडानेच त्वचा स्वच्छ करा.
- त्वचेवर फॉलिक्युलिटिसची समस्या झाली असेल तर पुरूषांनी शेविंग अजिबात करू नये. आणि महिलांनी वॅक्सिंग करू नये.