इंटरनेटवर सर्वात जास्त 'हे' सर्च करतात मुली, तुम्हालाही वाचून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 12:06 PM2018-07-26T12:06:05+5:302018-07-26T12:07:18+5:30
इंटरनेटमुळे आता लोकांमधील आपसातील संवाद कमी झाला आहे. समोर असलेल्या व्यक्तींसोबत बोलण्यापेक्षा लोक इंटरनेटवर इतर वेगवेगळ्या गोष्टी बघण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. काही लोक याचा माहिती मिळवण्यासाठीही वापर करतात.
इंटरनेटमुळे आता लोकांमधील आपसातील संवाद कमी झाला आहे. समोर असलेल्या व्यक्तींसोबत बोलण्यापेक्षा लोक इंटरनेटवर इतर वेगवेगळ्या गोष्टी बघण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. काही लोक याचा माहिती मिळवण्यासाठीही वापर करतात. इंटरनेटवर आपल मन शांत करण्यासाठी लोक काय-काय वाचत असतील यावर नुकताच एक अभ्यास करण्यात आलाय. या अभ्यास खासकरून देशातील मुलींबाबत करण्यात आलाय. यात मुली इंटरनेटवर सर्वात जास्त काय सर्च करतात. याचा खुलासा झाला आहे. या अभ्यासानुसार, देशातील साधारण ३० टक्के मुली इंटरनेटचा वापर करातत. पण त्या इंटरनेटचा वापर अधिक कशासाठी करतात हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
या अभ्यासात मुलींना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. त्या इंटरनेटवर किती तास घालवतात, दिवसाच्या कोणत्या वेळात जास्त इंटरनेट वापरतात आणि कोणत्या विषयांची माहिती घेणे त्यांच्या यादीत असतं, असे काही प्रश्न त्यांना विचारण्यात आले. यावरुन असे समोर आले की, जास्तीत जास्त मुली या इंटरनेटवर ब्यूटी टीप्स आणि ब्यूटी प्रॉडक्ट्सबाबत सर्च करतात.
होय! हे खरंय...या शोधानुसार नेहमीच आपल्या सुंदरतेबाबत चिंतेत राहणाऱ्या मुली इंटरनेटवपरही सर्वात जास्त याचबाबत वाचत असतात. आणि याच बाबतीच माहिती घेत असतात.
ब्यूटी टिप्स आणि सुंदर दिसण्यासाठी कोणत्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करावा, या इंटरनेटवर मुलींकडून सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. इतकेच नाही तर तुम्हाला वाचून धक्का बसेल की, इंटरनेटवर मुलींची दुसरी पसंतही ब्यूटी संबंधित गोष्टीच आहेत.
दुसऱ्या नंबरवर मुली सर्वात जास्त मेहंदी डिझाइन सर्च करतात. कारण भारतात प्रत्येक दुसऱ्या सणाला मुली आपल्या हातांवर मेहंदी लावणे पसंत करतात. त्यामुळे त्या मेहंदी डिझाइन सर्च करतात. त्यासोबतच मेहंदी काढता येणे हेही मुली सर्च करतात.
पहिल्या आणि दुसऱ्यानंतर मुली तिसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त काय सर्च करतात. हेही ब्यूटीशी संबधित गोष्ट आहे. मुली तिसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त ऑनलाइन शॉपिंगबाबत सर्च करतात. त्यांना काही खरेदी करायचं असो अथवा नसो त्या कित्येक तास ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर घालवतात.