केसांना तेल किती वेळासाठी लावावं? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 05:22 PM2018-12-21T17:22:10+5:302018-12-21T17:28:30+5:30

तुम्ही केसांना तेल लावता का? केसांना किती वेळ तेल लावून ठेवावं माहीत आहे का? याबाबत अनेकांनी शंका असते.

What is the minimum time oil must be on hair | केसांना तेल किती वेळासाठी लावावं? जाणून घ्या!

केसांना तेल किती वेळासाठी लावावं? जाणून घ्या!

googlenewsNext

तुम्ही केसांना तेल लावता का? केसांना किती वेळ तेल लावून ठेवावं माहीत आहे का? याबाबत अनेकांनी शंका असते. काही लोकांचं असं म्हणणं असतं की, फक्त एकच तास तेल ठेवावं, तर काही जणांचं म्हणणं असं असतं की, रात्रभर तेल लावून ठेवावं कारण ते तेल केसांमध्ये मुरतं आणि केसांच्या मुळांना पोषण मिळतं. पण यापैकी खरं काय मानावं? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत केसांना तेल किती वेळ लावणं योग्य ठरतं त्याबाबत...

साधारणतः हेअर ऑइलचं काम असतं हेअर फॉलिकल्सच्या मुळांपर्यंत जाऊन केसांच्या मुळांना मजबुत करणं, क्यूटिकल्स सील करणं, स्काल्पना पोषणं देणं आणि केसांची वाढ करणं. आता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात, केसांना तेल किती वेळा लावावं हे खरं तर तुमच्या केसांवर अवलंबून असतं. 

जर तुमच्या केसांच्या स्काल्पचा पीएच लेवल योग्य प्रमाणात असेल आणि केसांचं आरोग्यही उत्तम असेल तर ऑयलिंग ट्रिटमेंट म्हणजेच केसांना फक्त एक तासांसाठीच तेल लावावं. तेच जर केस डॅमेज असतील किंवा कोरडे असतील तर केसांना कंडिशनिंगची जास्त गरज असते. अशावेळी केसांना तेल लावून मसाज करावा आणि ते रात्रभर ठेवणं गरजेचं असत. 
आपल्या केसांचं टेक्शर लक्षात घेऊन आठवड्यातून एकदा एक एक करून दोन्ही पद्धतीने तेल लावू शकता. 

आपल्यापैकी अनेक लोकांना केसांमध्ये तेल लावण्याची योग्य पद्धत माहीत नाही. जाणून घेऊया केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत. जेणेकरून तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. 

तुम्हाला माहीत आहे का केसांना किती वेळ तेल लावणं योग्य ठरतं :

स्टेप 1:

मोठे दात असलेला कंगवा घेऊन केस नीट विंचरून घ्या. 

स्टेप 2:

तुमच्या केसांना जे तेल सूट होतं ते थोडंसं कोमट गरम करा. त्यानंतर थोडं थंड करून हातांच्या बोटांच्या सहाय्याने मसाज करा. 

स्टेप 3:

तुम्ही सरळ आपल्या स्काल्पवर तेल टाकू नका. त्यामुळे केस चिकट होतात. परिणामी केस धुण्यासाठीही जास्त शॅम्पू वापरले जातात. 

स्टेप 4:

केसांचे पार्टिशन करून घ्या. हाताच्या बोटांच्या सहाय्याने केसांच्या मुळांशी मसाज करा. 

स्टेप 5:

हलक्या हाताने मजाज करा. जर केसांच्या मुळांना जास्त मसाज केलं तर केस गळण्याची समस्या वाढते. त्याऐवजी हाताच्या बोटांनी डोक्याच्या त्वचेला मसाज करा. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढविण्यासाठी उपयोगी ठरेल. एसं 10 ते 15 मिनिटांसाठी करा. 

स्टेप 6:

जर तुम्हाला वाटत असेल की ऑइल केसांच्या मुळाशी सहज पोहोचावं तर केसांना स्टीम द्या. गरम पाण्यामध्ये टॉवेल भिजवून घट्ट पिळून घ्या आणि केसांना बांधा. त्या टॉवेलने केस घट्ट बांधून ठेवा. 

स्टेप 7:

एक गोष्ट लक्षात ठेवा की, तेल बराच वेळ केसांना लावून ठेवू नका कराण त्यामुळे वातावरणातील धूळ केसांना चिकटते. त्यामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते. तुम्ही 12 तासांपेक्षा जास्त वेळ केसांना तेल लावून ठेवू नका. 

Web Title: What is the minimum time oil must be on hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.