जाणून घ्या काय आहे ऑईल पुलिंग, दात होतील स्वच्छ आणि चमकदार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 11:24 AM2018-10-25T11:24:58+5:302018-10-25T11:26:20+5:30
सुंदर आणि आकर्षक दात सर्वांनाच आवडतात. पण अनेकदा चांगली काळजी घेऊनही दातांची आणि तोंडाची योग्य ती स्वच्छता होत नाही.
सुंदर आणि आकर्षक दात सर्वांनाच आवडतात. पण अनेकदा चांगली काळजी घेऊनही दातांची आणि तोंडाची योग्य ती स्वच्छता होत नाही. तोंडातील अॅसिडमुळे दातांचं इनेमल कमजोर होतं. ज्यामुळे कॅव्हिटीची समस्या होते. पण काही घरगुती उपायांनीही तुम्ही दातांना मजबूत करु शकता आणि कॅव्हिटी दूर करु शकता. असाच एक उपाय म्हणजे ऑईल पुलिंग. चला जाणून घेऊ काय आहे ऑईल पुलिंग आणि कसा कराव वापर....
कॅव्हिटीमुळे खराब होतात दात
दातांमध्ये छिद्र होणे याला वैज्ञानिक भाषेत दंतक्षय किंवा कॅव्हिटी म्हटले जाते. तोंडात असलेल्या अॅसिडमुळे दातांच आवरण कमजोर होतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या समस्या होतात. तोंडातील बॅक्टेरिया दातांच्या मुळात जमा होऊ लागतात, ज्याला प्लॉक असं म्हणतात. प्लॉकमध्ये असलेले बॅक्टेरिया तुमच्या खाण्यातील शुगर आणि कार्बोहायड्रेटला आम्लमध्ये रुपांतरित करतात. याच आम्लमुळे दात कमजोर होऊ लागतात आणि त्यामुळे कॅव्हिटी होते. पण काही घरगुती उपायांनी यावर मात करत येऊ शकते.
ऑईल पुलिंग
ऑईल पुलिंग हा फार जुना उपाय आहे जो कॅव्हिटी कमी करण्यासोबतच हिरड्यांमधून रक्त येणे आणि तोंडाची दुर्गंधी येणे दूर करतो. तसेच तोंडातील वेगवेगळे बॅक्टेरियाही दूर करण्यास याची मदत होते. यासाठी तिळाचं एक चमचा तेल तोंडात ठेवावं लागेल.
त्यानंतर हे तेल तोंडात २० मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर बाहेर टाका. पण हे तेल पोटात जाऊ देऊ नका. त्यानंतर कोमट पाण्याने गुरळा करा. मिठाच्या पाण्याचाही गुरळा केला जाऊ शकतो. नंतर नेहमीप्रमाणे दातांना ब्रश करा. हा उपाय रोज सकाळी रिकाम्या पोटी करा. हा उपाय खोबऱ्याच्या तेलासोबतही केला जाऊ शकतो.