काही केल्या केसगळती थांबत नाहीये? शाम्पूमध्ये 'ही' एक गोष्टी मिक्स करून लावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 03:22 PM2024-10-28T15:22:39+5:302024-10-28T15:34:35+5:30

Hair Care: काही असे घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने केसगळती थांबवली जाऊ शकते. तसेच या गोष्टींनी केस मुलायम आणि मजबूतही होतील. 

What to mix in shampoo for hair fall control | काही केल्या केसगळती थांबत नाहीये? शाम्पूमध्ये 'ही' एक गोष्टी मिक्स करून लावा!

काही केल्या केसगळती थांबत नाहीये? शाम्पूमध्ये 'ही' एक गोष्टी मिक्स करून लावा!

Hair Care: केसांना कमी पोषण मिळणं आणि प्रदूषण ही केसगळतीची मुख्य कारणं आहेत. आजकाल जास्तीत जास्त लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. एकदा केसगळती सुरू झाली की, थांबायचं नावच घेत नाही. अशात कमी वयातच टक्कल पडू लागतं. त्यामुळे केसांची काळजी घेणं आणि काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. काही असे घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने केसगळती थांबवली जाऊ शकते. तसेच या गोष्टींनी केस मुलायम आणि मजबूतही होतील. 

शाम्पू आणि मध

तुमच्या शाम्पूमध्ये मध मिक्स करून केसांवर लावल्याने केसांना भरपूर फायदे मिळतात. मधात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात जे केसांना चमकदार करतात. याने केस मुलायम होतात तसेच केसगळतीही कमी होते. समान प्रमाणात शाम्पू आणि मध मिक्स करा. हे केसांवर लावा आणि नंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता.

लिंबाचा रस

अनेकदा धूळ, माती, कोंडा केसांमध्ये जमा झाल्याने केसगळतीची समस्या होते. ही समस्या दूर करण्यासाठी शाम्पूमध्ये लिंबाचा रस मिक्स करून लावू शकता. व्हिटॅमिन सी भरपूर असलेल्या लिंबाच्या रसाने डोक्याची त्वचा हेल्दी बनते आणि केस दाटही होतात. एक चमचा लिंबाचा रस एक चमचा नॅचरल शाम्पूमध्ये मिक्स करून डोक्यावर लावा. केमिकल असलेल्या शाम्पूमध्ये लिंबाचा रस मिक्स करू नका. 

रोजमेरी एसेंशिअल ऑईल 

केसगळती थांबवण्याचा बेस्ट उपाय म्हणून रोजमेरी ऑईलकडे पाहिलं जातं. रोजमेरीचं पाणी किंवा रोजमेरी एसेंशिअल ऑईल शाम्पूमध्ये मिक्स करून केसांना लावा. नंतर केस धुवून घ्या. रोजमेरीने केसांची वाढ होते. तसेच डोक्याच्या त्वचेमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे केसगळती थांबते. यासाठी हातावर शाम्पू घेऊन त्यात तीन ते पाच थेंब एसेंशिअम ऑईल टाका. चांगलं मिक्स करून केस धुवा.

Web Title: What to mix in shampoo for hair fall control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.