...म्हणून पावसाळ्यात उद्भवते पिंपल्स आणि अ‍ॅक्नेची समस्या; अशी करा दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 01:12 PM2019-08-02T13:12:10+5:302019-08-02T13:12:39+5:30

जाणून घेऊया, पावसाळ्यात पिंपल्स आणि अ‍ॅक्नेची समस्या वाढण्यामागील कारण... तसेच यापासून सुटका करून घेण्याचे उपाय...

Why does acne appear during monsoon tips to stay protected | ...म्हणून पावसाळ्यात उद्भवते पिंपल्स आणि अ‍ॅक्नेची समस्या; अशी करा दूर

...म्हणून पावसाळ्यात उद्भवते पिंपल्स आणि अ‍ॅक्नेची समस्या; अशी करा दूर

Next

पावसाळ्यामध्ये वातावरणातील ओलावा वाढतो. अशा वातारणाचा आपल्या त्वचेवर फार परिणाम होतो. ज्यामुळे स्किन डॅमेज आणि डिहायड्रेट होण्याचा धोका वाढतो. अशातच जर काळजी घेतली नाही तर स्किन अ‍ॅलर्जी, पिंपल्स, रॅशेज आणि अ‍ॅक्नेची समस्या वाढते. आज आम्ही तुम्हाला सागणार आहोत की, पावसाळ्यात पिंपल्स आणि अ‍ॅक्नेची समस्या वाढण्यामागील कारण... तसेच यापासून सुटका करून घेण्याचे उपाय...

मान्सूनमध्ये पिंपल्स येण्याचं कारण... 

पावसाळ्यातील वातावरणामध्ये उष्णतेसोबतच ह्यूमिडिटी म्हणजेच, आद्रता वाढते. यामुळे स्किनमध्ये sebum (सीबम)चं प्रोडक्शन वाढत असून स्किन ऑयली आणि ग्रीजी होते. ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतात. तुमची स्किन चिपचिपित होतात. चेहऱ्यावर धूळ, माती आणि घाम चिकटतो. ज्यामुळे स्किन आणि पोर्स म्हणजेच, रोम छिद्र बंद होतात आणि पिपल्सची समस्या वाढते. 

निस्तेज होते त्वचा 

पिंपल्सच्या वाढलेल्या समस्येमुळे तुमची स्किन कोरडी आणि निस्तेज होते. अनेक लोकांना इतर वातावरणात पिंपल्सची समस्या होत नाही. परंतु पावसाळ्यात त्यांना या समस्येचा हमखास सामना करावा लागतो. पावसाळ्यात पिंपल्स फक्त चेहऱ्यावर नाही तर हात आणि पाठीवरही येतात. 

या गोष्टी ठेवा लक्षात... 

- सर्वात आधी हे समजून घ्या की, तुमचा स्किन टाइप काय आहे. 

- गरजेपेक्षा जास्त फेस क्लीन करणं टाळा

- ओव्हर क्लिनिंग केल्याने स्किन ड्राय होते, ज्यामुळे sebumचं सीक्रिशन जास्त होऊ लागतं आणि अॅक्ने होण्याचा धोका वाढतो. 

पिंपल्सपासून बचाव करण्यासाठी खास टिप्स 

- पिंपल्स आणि अ‍ॅक्ने दूर करण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे, कडुलिंब. कडुलिंबाची पानं, हळद आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट पिंपल्स असणाऱ्या त्वचेवर लावा आणि 10 मिनिटांसाठी थंड पाण्याने धुवून घ्या. स्किन स्मूथ होण्यासोबतच अॅक्ने फ्री होण्यासही मदत होईल. 

- बदामाचं तेल किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब एकत्र करा आणि पिंपल्स असलेल्या स्किनवर लावा. तुम्हाला गरज असेल तर कडुलिंबाच्या फळांनीही हलक्या हाताने पिंपल्सवर मसाज करू शकता. यामुळे मान्सूनमध्ये तुमची त्वचा पिंपल्सपासून दूर राहिल. 

- पिंपल्सपासून बचाव करायचा असेल तर खूप पाणी प्या आणि चहा-कॉफी आणि अल्कोहोलचं जास्त सेवन करणं टाळा. 

- नियमितपणे चेहरा स्वच्छ टॉवेलने आणि सॉफ्ट कपड्याने पुसून घ्या. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Why does acne appear during monsoon tips to stay protected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.