चेहऱ्याची रोमछिद्रे का होतात मोठे आणि कसे दूर कराल याचे डाग?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:08 PM2018-12-20T12:08:02+5:302018-12-20T12:14:42+5:30
चेहऱ्यावरील रोमछिद्रे किंवा स्कीन पोर्स का मोठे होतात? हा प्रश्न सतत मेकअप करणाऱ्या महिलांना पडत असेल. याचं उत्तर जाणून घेण्याआधी ते का असतात हे जाणून घेऊ.
चेहऱ्यावरील रोमछिद्रे किंवा स्कीन पोर्स का मोठे होतात? हा प्रश्न सतत मेकअप करणाऱ्या महिलांना पडत असेल. याचं उत्तर जाणून घेण्याआधी ते का असतात हे जाणून घेऊ. त्वचेवर रोमछिद्रे हे शरीरातील डीटॉक्स बाहेर काढण्यासाठी असतात. म्हणजे त्वचेला गरज असेल तेव्हा ही रोमछिद्रे स्वत: खुलतात आणि बंद होतात. या प्रक्रियासाठी त्वचेमध्ये विशेष प्रकारच्या लवचिकतेचा गुण असतो. अनेकदा केमिकलयुक्त ब्यूटी प्रॉडक्ट्स आणि प्रदूषणामुळे त्वचेची ही लवचिकता नष्ट होते. अशात चेहऱ्याची रोमछिद्रे खुलतात, पण बंद होऊ शकत नाहीत. अशात पोर्समुळे पिंपल्सही येतात. मग पोर्स लपवण्यासाठी महिला मेकअपची मदत घेतात. पण हा काही वेळापुरता उपाय आहे. या समस्येपासून नेहमीसाठी सुटका मिळवायची असेल तर काही घरगुती उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पोर्सची स्वच्छता गरजेची
धूळ-माती, तेल किंवा बॅक्टेरियामुळे चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोठी दिसायला लागतात. त्यामुळे यात सूजही येते. जर रोमछिद्रांमध्ये धूळ-माती भरलेली असेल तर ते बंदच होणार नाहीत. त्यामुळे यांची योग्यप्रकारे स्वच्छता करणे गरजेचे आहे. चेहऱ्यावरील रोमछिद्रे एखाद्या चांगल्या सॉफ्ट क्लींजरने कापसाच्या मदतीने स्वच्छ करावे. तुम्हाला हवं असेल तर रोमछिद्रांची स्वच्छता करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक क्लींजरचाही वापर करु शकता.
पपईचा फेसपॅक
पपईच्या पेस्टमध्ये मध आणि कच्च दूध मिश्रित करुन पॅक तयार करा. हे चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. याने त्वचा आकुंचन पावेल आणि पोर्सचा आकार लहान होईल.
गुलाबजल फायदेशीर
पोर्स म्हणजेच रोमछिद्रे स्वच्छ करण्यासाठी गुलाबजलने चेहरा स्वच्छ करा. गुलाबजलमध्ये अर्धा चमचा चंदन पावडर आणि एक चमचा लिंबू पावडर मिश्रित करुन चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. याने ओपन पोर्सची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होईल.
दह्याने दूर होईल समस्या
दह्यात असलेल्या लॅक्टीक अॅसिडने रोमछिद्रांमध्ये असलेली अडकलेली घाण दूर होते आणि याने पोर्स टाइट होतात. एक मोठा चमचा दही चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १० मिनिटांनी ओल्या कापडाने चेहरा स्वच्छ करा. नंतर पाण्याने धुवा. दही चेहऱ्यावर एका अॅंटी एजिंगप्रमाणे काम करतं.
टोमॅटोचा रस
टोमॅटोच्या रसाने काही वेळ चेहऱ्याची मसाज करा. आठवड्यातून २ वेळा असे केल्याने पोर्स हळूहळू बंद होतील. तसेच चेहरा आणखी चमकदारही दिसणार.