Winter Skin Care: ड्राय स्किन असणाऱ्यांसाठी काही खास टिप्स; चेहरा तजेलदार दिसण्यास होईल मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:00 PM2018-12-06T12:00:40+5:302018-12-06T12:03:11+5:30

थंडीमध्ये वातावरणातील गारवा आणि शुष्क हवा यांमुळे स्किन आणि केस कोरडे होतात. ज्या लोकांची स्किन ऑयली असते त्यांना थंडीमध्ये थोडा आराम मिळतो.

Winter skin care tips for dry skin | Winter Skin Care: ड्राय स्किन असणाऱ्यांसाठी काही खास टिप्स; चेहरा तजेलदार दिसण्यास होईल मदत!

Winter Skin Care: ड्राय स्किन असणाऱ्यांसाठी काही खास टिप्स; चेहरा तजेलदार दिसण्यास होईल मदत!

Next

थंडीमध्ये वातावरणातील गारवा आणि शुष्क हवा यांमुळे स्किन आणि केस कोरडे होतात. ज्या लोकांची स्किन ऑयली असते त्यांना थंडीमध्ये थोडा आराम मिळतो. पण ज्यांची स्किन कोरडी असते त्यांना त्वचेच्या अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागतो. 

थंडीमध्ये कोणतीही क्रिम वापरली किंवा मॉयश्चरायझर लावलं तरिही त्यांची स्किन थोड्या वेळात पुन्हा कोरडी होते. महागातल्या महाग क्रिम वापरूनही या समस्येपासून सुटका करता येत नाही. अशातच गरज असते ती योग्य पद्धतीने स्किनची काळजी घेण्याची. त्यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्किनची योग्य पद्धतीने काळजी घेण्याची गरज असते. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या ड्राय स्किनची काळजी घेऊ शकता. यामुळे तुमची स्किन हेल्दी आणि सुंदर दिसण्यास मदत होईल. 

सकाळी करा ही कामं :

1. हिवाळ्यात सकाळी उठल्यावर सर्वात आधी तुमचा चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. जर थंड पाणी वापरणं शक्य होत नसेल तर कोमट पाण्याचा वापर करा. पण लक्षात ठेवा गरम पाण्याचा वापर करणं टाळा. 2 ते 3 वेळा हातावर पाणी घेऊन चेहऱ्यावर मारा, असं केल्यामुळे त्वचा फ्रेश दिसण्यास मदत होईल. 

2. चेहरा स्वच्छ केल्यानंतर स्किनवर कोणतीही क्रिम किंवा मॉयश्चरायझरचा वापर करा. पण लक्षात ठेवा की, कोणतीही क्रिम किंवा मॉयश्चरायझर निवडताना तुमच्या स्किन टाइपनुसार त्याची निवड करा. 

3. यानंतर टोनरचा वापर करा. चेहरा आणि मानेवर टोनर वापरा आणि त्यानंतर 5 मिनिटांसाठी तसंचं ठेवा. 

4. आता सनस्किनचा वापर करा. ड्राय स्किन असणाऱ्यांनी एसपीएफ 30 किंवा त्यापेक्षा अधिक किंवा सनस्क्रिनचा वापर करणं फायदेशीर ठरतं. यापेक्षा कमी एसपीएफ असणारं सनस्क्रिन ड्राय स्किनसाठी फायदेशीर ठरत नाही.

5.  आता जर तुम्ही मेकअप करण्याचा विचार करत असाल तर चेहऱ्यावर लाइट मेकअपचा वापर करा. तुम्ही कमी केमिकल असणाऱ्या बीबी क्रिमचा वापर करू शकता. 

दिवसभरात करा ही कामं :

1. ड्राय स्किन असणाऱ्यांनी दिवसभरात सतत स्किनची काळजी घेणं गरजेचं असतं. तसेच थंडीमध्ये स्किनची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे सकाळनंतर दुपारी पुन्हा स्किनवर मॉयश्चरायझरचा वापर करा. 

2. चेहरा, मान आणि ओठांवर मॉयश्चरायझर लावा. शक्य असल्यास ओठांवर घरीच तयार केलेल्या लिप बामचा वापर करा.
 
3. दिवसभरात आरोग्यासाठी लाभदायक ठरणाऱ्या फळांचा वापर करा. याव्यतिरिक्त जेवढं शक्य असेल तेवढं जास्त पाणी प्या. पाण्याच्या सेवनाने बॉडी आतून हायड्रेट राहण्यास मदत होते आणि याचा परिणाम स्किनवर दिसून येईल. 

4. संध्याकाळी पुन्हा मॉयश्चरायझरचा वापर करा.

रात्री झोपण्यापूर्वी स्किनची अशी घ्या काळजी :

1. स्किनची काळजी घेण्यासाठी रात्रीचा वेळ महत्त्वपूर्ण ठरतो. रात्री त्वचेवर काही लावून झोपल्यामुळे रात्रभर या गोष्टी त्वचेवर परिणाम करतात आणि सकाळ होईपर्यंत त्याचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे ड्राय स्किन असणाऱ्यांनी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या स्किनवर 'नाईट क्रीम' वापरणं उपयोगी ठरतं. 

2. संध्याकाळी घरी परतल्यानंतर चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा आणि त्यानंतर त्यावर मॉयश्चरायझर लावा. 

3. स्किनचा ड्रायनेस कमी करण्यासाठी खास क्रिमचा वापर केला जाऊ शकतो. फक्त केमिकल असणाऱ्या क्रिम्सचा वापर करणं टाळा. 

4. रात्रीमध्ये सर्वाधिक गरजेची असते ती म्हणजे झोप. त्यामुळे दररोज 7 ते 8 तासांची झोप घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Winter skin care tips for dry skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.