हिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 12:14 PM2019-01-19T12:14:51+5:302019-01-19T12:16:07+5:30

आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवण्यासाठी सर्वात मोठ कारणं हे प्रदूषण नाही तर वातावरण असते. वातावरण बदललं तर लगेचच त्याचा परिणाम त्वचेवर होतो. आधीप्रमाणे ती सॉफ्ट आणि शायनी राहत नाही.

Winter skin care tips home made ghee face mask to get soft moisturised and glowing skin | हिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'

हिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'

Next

आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवण्यासाठी सर्वात मोठ कारणं हे प्रदूषण नाही तर वातावरण असते. वातावरण बदललं तर लगेचच त्याचा परिणाम त्वचेवर होतो. आधीप्रमाणे ती सॉफ्ट आणि शायनी राहत नाही. थंडीमध्ये तर त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे ती निस्तेज दिसू लागते. त्वचेवरील ग्लो नाहीसा होतो. कोरडी त्वचा असणाऱ्यांना त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मॉयश्चरायझरचा वापर केल्यानंतरही त्यांची त्वचा कोरडीच राहते. अनेकदा या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. परंतु थंडीमध्ये एवढं पाणी पिणं शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला थंडीमध्ये उपयोगी पडेल असा एक फेस मास्क सांगणार आहोत. थंडीमध्ये उद्भवणाऱ्या सर्व समस्यांपासून सुटका करण्यासाठी हा मास्क अत्यंत फायदेशीर ठरतो. 

थंडीमध्ये तूपापासून तयार करण्यात आलेला फेस मास्क लावण्याचे फायदे :

तूपामध्ये अनेक प्रकारचे फॅटी अॅसिड्स असतात. तूपाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. परंतु त्वचेबाबत सांगायचे झालेच तर तूप एक उत्तम अॅन्टी-एजंट प्रोडक्ट आहे. हे कोरड्या त्वचेच्या पेशींमध्ये जाऊन त्या हेल्दी करण्यास मदत करतो. त्यामुळे आपोआप त्वचा उजळण्यास मदत होते. तूपासोबत जर हळद आणि बेसन एकत्र केलं तर त्वचेसाठी ते अत्यंत फायदेशीर ठरतं. 

तूपाचा फेस मास्क तयार करण्याची कृती :

- सर्वात आधी एका बाउलमध्ये 2 चमचे शुद्ध तूप घ्या. घरी कढवलेलं तूप असेल तर आणखी चांगलं ठरेल. 

- आता तूपामध्ये 2 चमचे बेसन किंवा हळद एकत्र करा. त्यानंतर त्यामध्ये कोमट पाणी एकत्र करून पस्ट तयार करा. 

- तयार पेस्ट तयार करताना एक गोष्ट लक्षात घ्या की, पेस्टमध्ये पाणी जास्त होऊ देवू नका अन्यथा पेस्ट चहऱ्यावर राहणार नाही. 

- तयार पेस्ट चेहऱ्यावर बोटांच्या सहाय्याने किंवा ब्रशच्या मदतीने लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्या. 

किती वेळा हा मास्क वापरावा :

हिवाळ्यामध्ये हा तूप वापरून तयार केलेला मास्क आठवड्यातून एकदा तरी नक्की वापरा. थंडी वाढल्यानंतर तुम्ही आठवड्यातून दोनदाही याचा वापर करू शकता. आणि थंडी जास्तच असेल आणि त्यामुळे कोरड्या त्वचेच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आठवड्यातून तीनदाही तुम्ही याचा वापर करू शकता. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. 

ओठांवरही तूप लावू शकता :

थंडीमध्ये चेहऱ्याच्या त्वचेसोबत ओठांची त्वचाही लगेच कोरडी होते. ओठांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी एक चमचा तूपामध्ये थोडंसं मध एकत्र करा. एका छोट्या कंटेनरमध्ये ठेवा आणि दिवसातून 3 ते 4 वेळा ओठांवर लावा. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावा. त्यामुळे ओठांच्या कोरड्या त्वचेची समस्या दूर होते आणि ओठांवर नॅचरल गुलाबी रंग येतो. 

Web Title: Winter skin care tips home made ghee face mask to get soft moisturised and glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.