खुर्चीत बसून काम आरोग्यासाठी घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2016 04:52 PM2016-07-16T16:52:53+5:302016-07-16T22:22:53+5:30

जास्त वेळ खुर्चीवर किंवा एका जागेवर बसून काम केल्याने ह्दयरोग, मधुमेह या आजारासह अकाली मृत्यूचाही धोका आहे.

Working in a chair is dangerous for health | खुर्चीत बसून काम आरोग्यासाठी घातक

खुर्चीत बसून काम आरोग्यासाठी घातक

Next

/>
आॅफिसमध्ये खुर्चीवर बसून काम करणे आनंददायी  वाटत असेल! परंतु, जास्त वेळ खुर्चीवर  किंवा एका जागेवर बसून काम केल्याने तुमचे वजन तर वाढतेच. त्याचबरोबर ह्दयरोग, मधुमेह या आजारासह अकाली मृत्यूचाही धोका आहे. आपणही एकाच जागेवर बसून असे काम करीत असाल तर सावधानता बाळगण्याची गरज आहे.
तंत्रज्ञानामुळे  सर्वच क्षेत्रातील श्रमाची कामे ही कमी झाले असून, प्रत्येक ठिकाणी संगणक आले आहे. त्यामुळे जागेवरच बसून काम करावे लागत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात तर कर्मचारी तासन्तास संगणकावर बसलेले असतात. ही कामे जरी आनंददायी वाटत असली तरीही आजाराचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अलीकडे मधुमेह, हृदयरोग आदी आजारांचे प्रमाण हे वाढत आहे. वयाची चाळीशी पार केलेले अनेकजण कोणत्यातरी समस्येनेग्रस्त आपल्याला दिसतात. नोकरी असल्याने अशी कामे करणे ही गरजेची झाली आहेत. परंतु, ती करताना आपण जर दक्षता बाळगली तर या आजारापासून आपली सहज सुटका होऊ शकते.
थोडा ब्रेक घ्यावा : तासन्तास आपल्याला खुर्चीवर बसून, काम असेल. तर त्याकरिता मध्ये थोडा ब्रेक घेणे आवश्यक आहे. त्याकरिता थोडे चालावे, किंवा मोबाईलवर कुणाचा फोन आला तर उभे राहून बोलावे. त्यामुळे तुमचा तणावही कमी होतो. उलट काम करण्याठी उत्साह येऊन, तुम्ही चांगले काम करु शकता.
बसण्याची दक्षता : खुर्चीवर काम करीत असताना,पाठीमागे टेकून न बसता,  पुढच्या बाजूला झोकून बसावे. तसेच हात हे बगलेला जोडलेले ठेवावे.
पायºयाचा वापर करावा : आपले आॅफिस दुसºया किंवा तिसºया मजल्यावर असेल तर लिफ्टचा वापर टाळावा. दररोज या पायºयांचाचा वापर करावा, त्यामुळे तुम्हाला या समस्या उद्भविणार नाहीत.
खाण्याची दक्षता : हल्लीचे जीवन हे धावपळीचे झाले आहे.  त्यामुळे घरी वेळ न मिळाल्याने अनेकांचे दुपारचे जेवण किंवा नाश्ता हा कामाचा ठिकाणीच असलेल्या कॅन्टीनला होतो. जास्त प्रमाणात मसाला व तेलकट पदार्थांचा यामध्ये हमखास समावेश असतो. वजन वाढण्यासह अन्य आजारही वाढण्याची मोठी शक्यता असते. त्याकरिता घरुनच सोबत कडधान्ये घेऊन जावे, किंवा फळ खावीत. त्यामुळे तुमचे शरीर हे नेहमी निरोगी राहते.
सकाळी पायी चालावे :  सकाळी झोपेतून उठल्यानंतर दररोज अर्धा ते पाऊण तास पायी चालावे.  त्याचा निश्चीतच फायदा होतो.

चित्रपटातून खेळाचे  महत्त्व
शरीरासाठी खेळ हे किती महत्त्वाचे आहे. हे बॉलीवूडच्या अनेक चित्रपटातून दाखविण्यात आलेले आहे. अलीकडे प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या सुल्तान चित्रपटात सलमान हा कुस्तीपट्टूच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर प्रियांका चोप्राने मेरी कोम


या चित्रपटात उत्तमप्रकारे महिला  बॉक्सींग खेळाडूंची भूमिका साकारलेली आहे. तसेच अनेक चित्रपट हे खेळावर आधारित आहेत. यावरुनच निरोगी आरोग्यासाठी खेळ हे किती महत्त्वाचे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याकरिता शरीराला हालचाल ही खूप महत्त्वाची असून, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते.

 

Web Title: Working in a chair is dangerous for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.