World Smile Day : हसताय ना? हसायलाच पाहिजे!, जाणून घ्या हसण्याचे फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 10:55 AM2018-10-05T10:55:05+5:302018-10-05T10:55:45+5:30
आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या प्रेशरमुळे लोक हसणेच विसरल्याचे दिसते. असे म्हणतात की, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हे खरंच आहे की, हसणे हा अनेक रोगांवरील रामबाण उपाय मानला जातो.
आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या प्रेशरमुळे लोक हसणेच विसरल्याचे दिसते. असे म्हणतात की, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हे खरंच आहे की, हसणे हा अनेक रोगांवरील रामबाण उपाय मानला जातो. तुम्हीही सकाळी फिरायला गेल्यावर अनेकांना जोरजोरात हसताना पाहिले असेल. हा नजारा बघणे जरा विचित्र ठरु शकतं पण हे आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे.
कोणत्याही मजेदार गोष्टीवर किंवा गोष्टीमुळे हसल्यावर तुम्हाला किती रिलॅक्स वाटतं याचा अनुभव तुम्ही स्वत:ही घेतला असेल. हसताना अनेक मांसपेशींचा वापर होतो, ज्याने शरीराची एक्सरसाइज होते. आज ५ ऑक्टोबरला वर्ल्ड स्माईल डे(World Smile Day) आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या शुक्रवारी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. चला जाणून घेऊ हसण्याचे आरोग्यदायी फायदे...
१) हार्ट रेट होतं कमी
हसण्याने हार्ट रेट कमी होतात आणि याने शरीराला आराम मिळतो. जे लोक खूप हसतात त्यांना हृदयरोग होण्याचा धोका कमी असतो. तसेच याने ब्लड प्रेशरही कमी होतं.
२) तणाव होतो दूर
आधुनिक जगात तणाव एक सामान्य समस्या झाली आहे. याने आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. नेहमी हसत राहिल्याने तणाव कमी होतो. हसण्याने एन्डॉर्फिनची निर्मिती होते आणि हे तणावाचे हार्मोन्स दूर करतं.
३) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
हसण्याने शरीराला आराम मिळतो आणि यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. असे झाल्याने वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची तुम्हाला शक्ती मिळते.
४) हार्ट अटॅकचा धोका कमी होतो
अनेक शोधांमधून हे स्पष्ट झालं आहे की, हसण्याने हृदयाशी संबंधीत आजारांचा धोका ४० टक्के कमी होतो. हसल्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळे हृदयासहीत शरीराच्या सर्वच अंगांना योग्य प्रमाणात रक्त पुरवठा होतो. आणि यामुळेच हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
५) वजन होतं कमी
काही शोधांमध्ये हे सांगण्यात आले आहे की, हसल्याने किंवा खूश राहिल्याने भूक कमी लागते आणि याने वजन कमी करण्यास तुम्हाला मदत मिळते. हसल्याने शरीरात आनंदाचे हार्मोन्स सेरोटोनिन तयार होतात आणि यामुळे भूक कमी लागते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, १० ते १५ मिनिटे हसल्याने ४० कॅलरी बर्न होतात.
६) चेहऱ्यावर येते चमक
अनेक शोधांमधून हे समोर आले आहे की, खूश राहिल्याचा किंवा हसल्याचा चांगला प्रभाव आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवरही पडतो. चेहऱ्याच्या त्वचेचा हसल्याने व्यायाम होतो आणि याने चेहरा आणखी ग्लो करु लागतो.